
आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने अभिनेत्री श्रुती मराठेने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

मराठीसोबतच दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातही श्रुतीच्या अभिनयाचा बोलबाला आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रुती नेहमी आपल्या चाहत्यांसोबत कनेक्टेड असते.

तिच्या प्रत्येक फोटोवर चाहते भरभरुन प्रतिसाद देतात.

नुकतेच श्रुतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नव्या फोटोशूटमधील काही फोटो शेअर केले आहेत.

ब्लॅक आणि व्हाईट चेक्सच्या ड्रेसमध्ये श्रुतीच्या या हटके लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

काहींनी तिच्या या ड्रेसचे भरभरून कौतुक केले आहे, तर अनेक चाहत्यांनी श्रुतीच्या या स्टाईलला ‘लस घेण्याचा ड्रेस’, असे म्हणत कमेंट केल्या आहेत.