
सोनाक्षी सिन्हा कायमच चर्चेत असणारे नाव आहे. दबंग चित्रपटाच्या माध्यमातून सोनाक्षीने वेगळी ओळख मिळवली. सोनाक्षी आणि जहीर इक्बाल यांनी सात वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केले. विशेष म्हणजे सोनाक्षी सिन्हा हिने जहीर इक्बालसोबतचे नाते काही वर्ष सर्वांपासून लपवून ठेवले. लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा जहीर इक्बालच्या कुटुंबासोबतच राहताना दिसली. लग्नाला 16 हिने पूर्ण झाल्यानंतर सोनाक्षी सिन्हा तिच्या लग्नाबद्दल भाष्य करताना दिसत आहे. सोनाक्षी सिन्हा हिने नुकताच तिच्या नव्या घराची झलक चाहत्यांना दाखवली. सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांचे अत्यंत आलिशान घर असून त्यांनी खास डिझाईन केले. घरातील प्रत्येक कोना त्यांनी फार विचार करून तयार केला. फराह खान ही जहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हाच्या घरी पोहोचली होती.
सोनाक्षी सिन्हा हिने आपल्या नव्या घराची झलक चाहत्यांना दाखवली. यावेळी सोनाक्षी सिन्हा हिची आई पूनम सिन्हा, जहीर इक्बाल याची आई, जहीर आणि फराह खानचा कूक दिलीप हे उपस्थित होते. सोनाक्षी सिन्हाची सासू पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आली. यादरम्यान सोनाक्षीच्या बेडरूममध्ये खास लाल रंगाचे फ्रीज बघायला मिळाले. हे फ्रीज नेमके बेडरूममध्ये का ठेवले याबद्दल सोनाक्षी सिन्हा हिने सांगितले.
सोनाक्षी सिन्हा म्हणाली की, आमच्या लग्नामध्ये आमची मैत्रिण हुमा कुरैशी हिने आम्हाला हे खास फ्रीज दिले आहे. हुमा कुरैशीला माहिती आहे की, जहीर इक्बाल याचा सर्वात आवडता रंग लाल आहे, त्यामुळे तिने हे फ्रीज आम्हाला लग्नात गिफ्ट म्हणून दिले. 160 करोडची मालकीन असलेल्या हुमा कुरैशी हिने हे फ्रीज सोनाक्षी आणि जहीर इक्बाल यांना लग्नात गिफ्ट दिले.
सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांची बेस्टफ्रेंड हुमा कुरैशी आहे. हुमाच्याच घरी पहिल्यांदाच जहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हा यांचे कुटुंबिय भेटले होते. हेच नाही तर सोनाक्षीने पहिल्यांदाच खुलासा केला की, आईपेक्षा जास्त काळ वडील शत्रुघ्न सिन्हा यांना पटवण्यात गेला. काही दिवसांपूर्वीच शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले होते की, माझी मुलगी आनंदी तर मी देखील आनंदी आहे. तिच्या आनंदापेक्षा माझ्यासाठी काहीच मोठे नाहीये.