AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत लग्न करणार तारा सुतारिया? म्हणाली, माझ्या प्रेमावर मला…

अभिनेत्री तारा सुतारिया ही मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. रणबीर कपूरच्या भावाला काही वर्षे डेट केल्यानंतर आता परत एकदा अभिनेत्री प्रेमात पडलीये. विशेष म्हणजे तिने याबद्दल थेट एका शोमध्येच खुलासा केला आहे.

महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत लग्न करणार तारा सुतारिया? म्हणाली, माझ्या प्रेमावर मला...
Tara Sutaria
| Updated on: Aug 01, 2025 | 4:31 PM
Share

बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारिया तिच्या चित्रपटांपेक्षा अधिक खासगी आयुष्यामुळे सध्या चर्चेत आहे. तारा सुतारिया रणबीर कपूरचा भाऊ आदर जैन याला डेट करत होती. दोघे लग्न करणार असल्याची चर्चा असताना दोघांचे ब्रेकअप झाले. आता तारा सुतारियाच्या लव्ह लाईफबद्दल अत्यंत मोठी माहिती पुढे आलीये. चक्क राजकारणाशी संबंधित असलेल्या व्यक्तीला तारा सुतारिया आता डेट करतंय. तिने एका शोमध्ये याबद्दल सांगून टाकलंय. तारा सुतारिया वीर पहाडिया डेट करत असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसतंय.

नुकताच शोमध्ये बोलताना तारा सुतारिया हिने म्हटले की, मी माझ्या रिलेशनशिपमध्ये खूपच जास्त आनंदी आहे. मी खूप चांगल्या स्थितीत आहे जिथे मला खूप आनंद होत आहे. हे चौधवीच्या चांदचे भाव आहेत…प्रेम माझ्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट नक्कीच आहे आणि माझे त्याला नेहमीच प्राधान्य आहे. 

ती पुढे म्हणाली की, मी नक्कीच भाग्यवान आहे की, मला माझ्या प्रेमावर विश्वास होता… मी अशा लोकांपैकी एक आहे जे प्रेमावर विश्वास ठेवतात…मात्र, यावेळी तारा सुतारिका हिने वीर पहाडिया याचे नाव घेतले नसले तरीही ती कोणाबद्दल बोलत आहे, याचा थेट अंदाज सर्वांना आल्या. आदर जैनसोबतच्या ब्रेकअपनंतर तिने वीर पहाडियाला डेट करण्यास सुरूवात केल्याचे सांगितले जातंय. 

वीर पहाडिया याचे नाव यापूर्वी सारा अली खान हिच्यासोबत जोडले गेले आहे. वीर पहाडिया याचा भाऊ शिखर पहाडिया हा जान्हवी कपूर हिला डेट करतोय. काही दिवसांपूर्वीच दोघे तिरूपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. आता त्यामध्ये तारा सुपारिया आणि वीर पहाडिया डेट करत असल्याचे सांगितले जातंय. अनेकदा दोघे एकत्र स्पॉट झाले आहेत.

वीर पहाडिया आणि शिखर पहाडिया हे दोघे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नातू आहेत. सुशीलकुमार शिंदे यांच्या मोठ्या मुलीचे हे दोन्ही मुले असून मावशी प्रणिती शिंदे हिचा निवडणूक प्रचारासाठी शिखर पहाडिया हा काही दिवसांपूर्वीच मैदानावर उतरला होता. आता तारा सुतारिया महाराष्ट्राची सून होणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसतंय.

Follow Us
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?