अभिनेत्याकडून महिला खासदारची पोलखोल, ‘चपलेने मारायची आणि खायला…’, धक्कादायक सत्य समोर

मला मारहाण करायची, माझ्या जेवणात रक्त मिसळायची आणि...., अभिनेत्याकडून महिला खासदारची पोलखोल, धक्कादायक सत्य समोर आल्यानंतर चाहत्यांना बसला धक्का...

अभिनेत्याकडून महिला खासदारची पोलखोल, चपलेने मारायची आणि खायला..., धक्कादायक सत्य समोर
फाईल फोटो
| Updated on: Oct 11, 2025 | 1:16 PM

झगमगत्या विश्वातील अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल सांगितलं आहे. ज्यामुळे बॉलिवूडची एक बाजू समोर आली. पण इंडस्ट्रीमध्ये असं फक्त अभिनेत्रींसोबतच नाही तर, अभिनेत्यांसोबत देखील होतं. एका अभिनेत्याला तर महिला खासदाराने मारलं आहे. एका मुलाखतीत खुद्द अभिनेत्याने धक्कादायक खुलासा केला. ‘तिने मला चपलेने मारलं आणि मला खायला रक्त दिलं…’ असा धक्कादायक खुलासा अभिनेत्याने केला.

महिला खासदाराची पोलखोल करणारा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाहीतर अध्ययन सुमन होता… अध्ययन सुमन हा प्रसिद्ध अभिनेते शेखर सुमन यांचा मुलगा आहे. ज्या महिला खासदाराची अभिनेत्याने पोलखोल केली आहे, त्या दुसऱ्या कोणी नसून कंगना राणौत आहेत. एक काळ असा होता, जेव्हा अध्ययन सुमन आणि कंगना राणौत यांच्या नात्याची चर्चा सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली होती.

सांगायचं झालं तर, दोघांची ओळख 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘राज – द मिस्ट्री कंटिन्यू’ सिनेमात झाली. ओळखीची रुपांतर कालांतराने मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमात झालं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर 2009 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अध्यायन सुमनने कंगना राणौतने त्याचा छळ केल्याचे सांगितलं होतं, त्यानंतर त्याने त्याच्या कंगनापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. मुलाखतीत अध्यायन म्हणालेला, कंगनाने त्याला चप्पल आणि सँडलने मारहाणही केली. “कंगना मला मारहाण करायची आणि सर्वांसमोर माझा अपमान करायची. ती माझ्या जेवणात रक्त मिसळायची आणि माझ्यावर जादूटोणाही करायची.”

पुढे अभिनता म्हणाला, ‘ज्या दिवशी मी कंगना राणौतशी ब्रेकअप केलं, त्या दिवशी ती खूप रागावली होती. तिने तिची सँडल काढली आणि माझ्यावर फेकली. तिने माझा फोन भिंतीवर आपटून तो फोडला. ती माझ्यावर ओरडत होती.’ दोघांच्या नात्याच्या चर्चा आजही चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात.

कंगना यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्या त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतात. शिवाय वादग्रस्त वक्तव्यांमुळे देखील कंगना अनेकदा मोठ्या अडचणाीत अडकल्या. पण कंगना कधीच स्वतःचं परखड मत मांडण्याआधी पुढचा विचार करत नाहीत.

एवढंच नाही तर, आज वयाच्या 39 व्या वर्षी देखील कंगना अविवाहित आहेत. पण अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय सेलिब्रिटींसोबत कंगना यांच्या नावाची चर्चा रंगली. सुरज पंंचोली, ऋतिक रोशन, अजय देवगण यांसारख्या सेलिब्रिटींसोबत कंगना यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी एकेकाळी जोर धरला होता.