वर्षा उसगांवकर यांनी ‘या’ अभिनेत्रीबद्दल केले धक्कादायक विधान, थेट म्हणाल्या, तुझी जीभच…

अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे वर्षा उसगांवकर यांचा चाहतावर्गही मोठा आहे. आता वर्षा उसगांवकर या बिग बॉस मराठीमध्ये दाखल झाल्या आहेत. वर्षा उसगांवकर यांनी मराठी चित्रपटांसोबत बॉलिवूडमध्येही धमाका केलाय.

वर्षा उसगांवकर यांनी या अभिनेत्रीबद्दल केले धक्कादायक विधान, थेट म्हणाल्या, तुझी जीभच...
Varsha Usgaonkar
| Updated on: Aug 12, 2024 | 10:00 PM

बिग बॉस मराठी 5 चांगलेच चर्चेत असल्याचे बघायला मिळतंय. नुकताच आता बिग बॉसच्या घरात मोठा हंगामा होताना दिसला. हेच नाही तर घरात मोठे वाद बघायला मिळाले. बिग बॉसच्या घरात सुरूवातीपासूनच वर्षा उसगांवकर आणि निकी तांबोळी हा वाद बघायला मिळाला. यानंतर रितेश देशमुख याने निकी तांबोळीची कान उघडणी देखील केली. सध्या बिग बॉसच्या घरातील सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे निकी तांबोळी आहे. आता बिग बॉसच्या घरात मोठा वाद झाला. यानंतर बिग बॉसने कॅप्टन अंकिता हिची कानउघडणी देखील केली.

बिग बॉसच्या घरात पॅडी आणि निकी तांबोळी यांच्यामध्ये वाद झाल्याचे बघायला मिळाले. हेच नाही तर हा वाद इतका जास्त टोकाला गेला की, थेट धक्काबुक्की सुरू झाली. बिग बॉस मराठीच्या घराची कॅप्टन अंकिता ही थेट निकी तांबोळी हिला धक्का देतानाही दिसली. यानंतर घरात मोठा हंगामा झाल्याचे बघायला मिळाले.

रागामध्ये निकी तांबोळी हिने थेट कपडेही फेकून दिली. निकी तांबोळी आणि वर्षा उसगांवकर यांच्यामध्येही वाद झाल्याचे बघायला मिळाले. वर्षा उसगांवकर या थेट निकी तांबोळी हिला म्हणाल्या की, तुझी जीभच लुळी पडेल. यावर निकी तांबोळी थेट म्हणाली की, तुम्ही माझी जीभ कापणार का? यावर वर्षा उसगांवकर म्हणाल्या की, लुळी पडणार..

परत एकदा आता बिग बॉसच्या घरात वर्षा उसगांवकर आणि निकी तांबोळी असा वाद बघायला मिळाला. दोघीही एकमेकांना काही गोष्टी सुनावताना दिसल्या. दुसरीकडे अंकिताला बिग बॉसने सांगितले की, बिग बॉस किंवा रितेश देशमुख काही गोष्टींबद्दल बोलणार नाहीत, ते कॅप्टनलाच बोलावे लागेल.

कॅप्टनला जे अधिकार मिळाले आहेत, त्यामध्ये काही गोष्टी करून घेणे हे कॅप्टनचे काम आहे. आता बिग बॉसच्या घरात बाथरूमवरून वाद होताना दिसत आहे. दुसरीकडे निकी तांबोळीचे म्हणणे आहे की, कॅप्टन अंकिता आमचे अजिबात ऐकत नाही, ती फक्त आणि फक्त तिच्या ग्रुपचा विचार करते आणि तिच्याच लोकांचे ऐकते. आता बिग बॉसच्या घरात दोन बेबी आले आहेत. बेबीचा टास्क बिग बॉसने घरातील सदस्यांना दिला आहे.