
बॉलिवूड असो की हॉलिवूड, इंडस्ट्रीमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांना पदार्पण करताच इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्धी मिळते. पण अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांना अनेक प्रयत्न करून देखील इंडस्ट्रीमध्ये सुपरहिट चित्रपट देता आला नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका बॉलिवूड अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या मागे सुपरस्टारडम नव्हतं. पण ती आता जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे. कोण आहे ती अभिनेत्री?
सिनेसृष्टीत सर्वसाधारणपणे असे मानले जाते की, अभिनेते अभिनेत्रींपेक्षा अधिक मानधन घेतात आणि त्यामुळे तेच जास्त श्रीमंत असतात. मात्र, एका अभिनेत्रीने या सगळ्या गोष्टींना पूर्ण विराम दिला आहे. विशेष म्हणजे, या अभिनेत्रीने आजपर्यंत एकही हिट चित्रपट दिलेला नाही तरीही ती जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री ठरली आहे.
जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री
आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत ती अभिनेत्री म्हणजे हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जैमी गर्ट्झ आहे. जैमी गर्ट्झ या अमेरिकन अभिनेत्री असून त्यांचा जन्म 1965 साली शिकागो येथे झाला. 1980 च्या दशकात त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ‘एंडलेस लव्ह’ या चित्रपटातून त्यांनी फिल्मी करिअरची सुरुवात केली. त्यानंतर हॉलीवूड अभिनेता रॉबर्ट डाउनी ज्युनियरसोबत त्यांनी काम केले आणि काही प्रमाणात लोकप्रियताही मिळवली.
मात्र, दुर्दैवाने त्यांचा एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला नाही. 90 च्या दशकात त्यांनी टीव्ही क्षेत्राकडे मोर्चा वळवला आणि ‘Twister’, ‘Ally McBeal’ यांसारख्या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये भूमिका केल्या. त्यानंतर ‘Diffile People’ हा त्यांचा शेवटचा टीव्ही शो ठरला. 2022 मध्ये ‘I Want You Back’ या चित्रपटात त्यांनी कॅमिओ भूमिका केली होती.
तरीही इतकी श्रीमंत कशी?
फोर्ब्सच्या अहवालानुसार जैमी गर्ट्झ यांची एकूण संपत्ती तब्बल 66 हजार कोटी रुपये आहे. या संपत्तीच्या जोरावर त्यांनी टेलर स्विफ्ट, रिहाना आणि सेलेना गोमेज यांनाही मागे टाकले आहे. जगातील सर्वात श्रीमंत अभिनेता टायलर पेरी (1.4 अब्ज डॉलर) असला तरी संपत्तीच्या बाबतीत जैमी त्यांच्याही कितीतरी पुढे आहेत.
1989 साली जैमी यांनी टोनी रेस्लर या अब्जाधीश अमेरिकन उद्योगपतीशी लग्न केले. टोनी रेस्लर हे प्रसिद्ध गुंतवणूकदार असून त्यांचे क्रीडा आणि व्यवसाय क्षेत्रात मोठे नाव आहे. या दाम्पत्याला तीन मुले आहेत. लग्नानंतर जैमी यांनी पतीसोबत मिळून विविध व्यवसायांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली. त्यांनी अनेक स्पोर्ट्स टीम्समध्ये पैसे गुंतवले असून त्यांची स्वतःची बेसबॉल टीमही आहे.