
‘द केरळ स्टोरी’ चित्रपटातील अभिनेत्री अदा शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ती कोणत्या चित्रपटासाठी नाही, तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अदा शर्मा गेल्या काही दिवसांपासून सुशांत सिंह राजपूतच्या घरात राहात आहे. सुशांतने याच घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. नंतर अभिनेत्री अदा शर्माने ते घर विकत घेतलं. आता त्या घरात ती आपल्या आईसोबत राहत आहे. पण अदाने सुशांत सिंह राजपूत वापरत असलेले संपूर्ण फर्निचर काढून टाकले आहे. तिने घरात नवे फर्निचर केले आहे.
अदा शर्माच्या घरात एकही जुने फर्निचर नाही
प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक फराह खान गेल्या काही दिवसांपासून तिच्या यूट्यूब व्लॉग्समुळे खूप चर्चेत आहे. फराह अनेकदा बॉलिवूड स्टार्सच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत जेवण बनवतात आणि गप्पा मारताना दिसते. अलीकडच्या व्लॉगमध्ये फराह खान अदा शर्माच्या घरी पोहोचली आणि अदाच्या घराची स्थिती पाहून फराह स्वतःच थक्क झाली. जेव्हा तिने अदाच्या घराचे व्हिडीओ शेअर केले तेव्हा चाहतेही देखील तो पाहून हैराण झाले आहेत.
फर्निचर न ठेवण्याचं अदा ने सांगितलं हे कारण
फराह जेव्हा अदाच्या घरी पोहोचली, तेव्हा तिला दिसलं की अदाच्या घरात ना सोफा आहे, ना डायनिंग टेबल आणि ना कोणतंही लक्झरी फर्निचर. घराच्या मुख्य भागात बसण्यासाठी एक खुर्चीही दिसली नाही. फराहने विचारल्यावर अदाने सांगितली की ती आपल्या आईसोबत जमिनीवर बसूनच जेवते आणि तिच्या घरी कोणतेही मित्र येत नाहीत किंवा ती पार्टी करत नाहीत. तिचं घर रिकामं असण्याचं कारण हेही आहे की तिला रिकामी जागा आवडते जेणेकरून ती घरात आरामात नाचू शकेल किंवा काही खेळू शकेल.
सुशांतच्या घरात अदा शर्माला भीती वाटत नाही
दरम्यान, फराहने अदा शर्माला सुशांतच्या जुन्या घराबद्दल आणि त्याच्याशी जोडलेल्या आठवणींबद्दल विचारलं, तेव्हा तिने अतिशय निर्भीडपणे उत्तर दिलं. अदा म्हणाली की तिला मेलेल्या माणसांची किंवा भुतांची अजिबात भीती वाटत नाही. तिची देवावर गाढ श्रद्धा आहे आणि ती आपल्या आईसोबत या घरात नियमितपणे पूजा-पाठ करते. अदाचा विश्वास आहे की आता घराची ऊर्जा खूप सकारात्मक आहे.
ती पुढे म्हणाली, “मी खार पाळली आहे. माझ्या घरात एक टॉय वाली मांजरही आहे, ज्याचे इंस्टाग्राम पेज आहे. याशिवाय मी एक माशीही पाळली आहे. ही माशी माझ्याच घरात राहते.”
चामुंडेश्वरीपासून ‘अदा’ होण्याचा प्रवास
फराहशी बोलताना अदाने तिचं खरं नावही उघड केलं. तिने सांगितलं की तिचं खरं नाव ‘चामुंडेश्वरी’ आहे. तिच्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी तिला घाबरवलं होतं की इतक्या जड नावाने तिला चित्रपटात काम मिळणार नाही. त्यामुळेच तिने आपलं नाव बदलून ‘अदा शर्मा’ केलं.