Adinath Kothare Ramayana : आदिनाथ कोठारेच्या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती, ‘रामायण’ सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर दबदबा, कमावला इतक्या कोटींचा गल्ला

Ramayana Box Office Collection Day 9 : आदिनाथ कोठारेच्या 'रामायण' या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर नवव्या दिवशी किती कोटींची कमाई केली, जाणून घेऊया.

Adinath Kothare Ramayana : आदिनाथ कोठारेच्या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती, रामायण सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर दबदबा, कमावला इतक्या कोटींचा गल्ला
| Updated on: Nov 13, 2026 | 9:36 PM

रणबीर कपूर, साई पल्लवी, रवी दुबे, यश, आणि आदिनाथ कोठारे यांचा ‘रामायण’ हा सिनेमा 5 नोव्हेंबर 2026 रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटानं पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली.  ‘रामायण’ सिनेमाला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. काही कलाकारांनी या सिनेमावर टीका केली आहे. असं असलं तरी आठ दिवसांच्या आत ‘रामायण’ चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींचा टप्पा ओलांडला. चित्रपटाच्या नवव्या दिवसाच्या कमाईबद्दल जाणून घेऊया.

‘रामायण‘ सिनेमाची जगभरातील कमाई

Loading...

SACNILK रिपोर्टनुसार, पौराणिक चित्रपट ‘रामायण’नं पहिल्या दिवशी 64.85 कोटींची कमाई केली. दिवाळीच्या विकेंडमध्ये कमाईत थोडा चढ-उतार झाला, पण सोमवारी चित्रपटानं एकाच दिवसात 100 कोटींहून अधिक कमाई केली. आठव्या दिवशी 53 कोटींहून अधिक कमाई केल्यानंतर, नवव्या दिवशी, शुक्रवारी, चित्रपटाच्या कमाईत घट दिसून आली. 13 नोव्हेंबरपर्यंत चित्रपटानं 33.32 कोटी कमावले आहेत. यांसह, भारतातील एकूण नेच कमाई 517.92 कोटींवर पोहोचली आहे. एकूण कमाईच्या बाबतीत, चित्रपटानं आतापर्यंत 714.37 कोटी कमावले आहेत. सिनेमाची जगभरातील कमाई 1033.55 कोटींवर पोहोचली आहे.

 

सिनेमाची 9 दिवसांची कमाई 

‘रामायण‘ सिनेमानं पहिल्या दिवशी 64.25 कोटी, दुसऱ्या दिवशी 48.05 कोटी, तिसऱ्या दिवशी 69.80 कोटी, चौथ्या दिवशी 56.15 कोटी, पाचव्या दिवशी 107.50 कोटी, सहाव्या दिवशी 94.10 कोटी, सातव्या दिवशी 70.65 कोटी, आठव्या दिवशी 53.50 कोटी कमावले. तर नवव्या दिवशी 33.32 कोटी कमावले. (ही आकडेवारी दिवसाअखेरीस बदलू शकते.)

‘रामायण‘ हा नितेश तिवारी दिग्दर्शित एक पौराणिक चित्रपट आहे. या सिनेमात मराठी अभिनेता आदिनाथ कोठारेनं भरतची भूमिका साकारली असून त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचं भरघोस प्रेम मिळतंय. ‘रामायण‘ हा चित्रपट दोन भागांमध्ये बनवला आहे. पहिला भाग दिवाळी 2026 ला प्रदर्शित झाला, तर दुसरा भाग 2028 मध्ये प्रदर्शित होईल.  ‘रामायण’ या चित्रपटात रणबीर कपूर, यश, साई पल्लवी, रवी दुबे, अनुपम खेर, काजल अग्रवाल, रकुल प्रीत सिंग, विवेक ओबेरॉय, कुणाल कपूर, आदिनाथ कोठारे, अरुण गोविल, इंदिरा कृष्णन आणि लारा दत्ता यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us