
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) हा गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. मात्र, आपल्या चित्रपटांमुळे नाही तर पर्सनल लाईफमुळे आदित्य रॉय कपूर हा चर्चेत आहे. आदित्य रॉय कपूर हा चंकी पांडे याची लेक अनन्या पांडे हिला डेट करत आहे. काही दिवसांपूर्वीच आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे (Ananya Pandey) हे विदेशामध्ये चांगला वेळ घालवताना दिसले. इतकेच नाही तर काही दिवसांपूर्वीच दोघे एकसोबत मुंबईमध्ये स्पाॅट झाले. विदेशातून मुंबई विमानतळावर आल्यावर पापाराझी यांना पाहून अनन्या पांडे ही चक्क लाजताना दिसली. विशेष म्हणजे विदेशातील यांचे अत्यंत खास आणि स्पेशल फोटो (Photo) हे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
आता नुकताच आदित्य रॉय कपूर याने मोठा खुलासा केला आहे. इतकेच नाही तर आदित्य रॉय कपूर हा नेपोटिझमवर देखील बोलताना दिसला आहे. आदित्य रॉय कपूर हा म्हणाला की, मी चित्रपटांमध्ये येण्यासाठी अजिबातच माझ्या भावांची कधीच मदत घेतली नाही. मी आज ज्याठिकाणी आहे, तो फक्त आणि फक्त माझ्या मेहनतीमुळेच आहे.
पुढे आदित्य रॉय कपूर म्हणाला की, मी अनेक ठिकाणी ऑडिशन देखील दिली आहेत. बऱ्याच ऑडिशनमधून मला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. मात्र, मला याचे अजिबातच वाईट वाटले नाही. कारण देखील त्याचे तितकेच मोठे होते. कारण मी प्रत्येकवेळी माझ्यामध्ये सुधारणा करत आलो आहे.
मी तीन चित्रपटांमध्ये ज्यावेळी साईट रोल केले, त्यानंतर मला चित्रपटामध्ये मुख्य अभिनेत्याची भूमिका करण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे यावेळी कोणत्याही चित्रपटांमध्ये माझे भाऊ हे माझ्यासोबत किंवा मदतीला नव्हते. मुळात म्हणजे तुम्हाला इथे टिकायचे असेल तर तुम्हाला मेहनत केल्याशिवाय अजिबातच पर्याय नसल्याचे आदित्य रॉय कपूर याने स्पष्ट केले.
आदित्य रॉय कपूर याने बोलताना हे स्पष्ट केले की, नेपोटिझम वगैरे काही नाही. गेल्या काही दिवसांपासून अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर हे रिलेशनशिपमध्ये आहेत. मात्र, या दोघांनीही आपल्या नात्यावर काही भाष्य हे अजूनही केले नाही. मात्र, दुसरीकडे चाहते यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अनेकांनी आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे यांची जोडी प्रचंड आवडलीये.