बहिणीकडून अभिनेत्याचा पर्दाफाश! दाखवला बेगमचा चेहरा, धर्म बदलून केला निकाह

सोशल मीडिया स्टारने हिंदू मुलीसोबत केलाय निकाह? पत्नीचा कुटुंबासोबत फोटो समोर येताच सर्वत्र खळबळ..., सोशल मीडियावर अदनान शेख याच्या निकाहचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल

बहिणीकडून अभिनेत्याचा पर्दाफाश! दाखवला बेगमचा चेहरा, धर्म बदलून केला निकाह
| Updated on: Oct 02, 2024 | 9:36 AM

सोशल मीडिया इंफ्लूएंसर अदनान शेख सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आला आहे. अदनान याने नुकताच लॉन्ग टाइम गर्लफ्रेंड आयेशा शेख हिच्यासोबत लग्न केलं आहे. अदनान याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. पण आता अदनान याच्या बहिणीने त्याच्यावर गंभीर आरोप केलं आहेत. ज्यामुळे अदनान याच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अदनान याच्या बहिणीचं नाव इफ्फत असं आहे.

अदनान याची बहीण इफ्फत हिने फक्त भाऊ अदनान याला धमकीच दिली नाही तर, त्याच्या पत्नीचा चेहरा देखील दाखवला आहे. इफ्फत हिने इन्स्टाग्राम स्टोरीवर अदनान याच्या पत्नीचा एक फोटो पोस्ट केला आहे. एवढंच नाही तर, अदनान याची पत्नी हिंदू असल्याचा दावा देखील इफ्फत हिने केला आहे.

 

 

इफ्फत हिने सांगितल्यनुसार, अदनान याच्या पत्नीचं नाव रिद्धी जाधव असं होतं. अदनान याने रिद्धीचं धर्म परिवर्तन केलं आणि त्यानंतर लग्न केलं. सध्या सर्वत्र अदनान आणि आयेशा यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. इफ्फत हिने रिद्धी आणि तिच्या पूर्ण कुटुंबाचा फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

रिद्धी जाधव हिच्या कुटुंबाचा फोटो पोस्ट करत इफ्फत हिने अदनान याला टॅग केलं आहे. इफ्फत म्हणाली, ‘कोणीतरी सांगा आता याला, काय झालं? आता मी काय करू, आणखी काही गोष्टी पोस्ट करु का? माझ्या खासगी गोष्टी पोस्ट करणं बंद कर नाहीतर…’ अनेक फोटो पोस्ट करत अदनान याची बहीण त्याला धमकावत आहे. पण ती अशा पोस्ट करत आहे… असे देखील अनेक प्रश्न याठिकाणी निर्माण हेत आहेत.

 

 

सोशल मीडिया स्टारचा विषय चर्चेत असताना, अदनान याने मोठं वक्तव्य केलं आहे. ‘माझ्या विरोधात रचण्यात आलेलं एक कट आहे.’ पण अदनान याने कुठेच बहिणीचं नाव घेतलं नाही. सध्या सर्वत्र अदनान याच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.