
Aga Aga Sunbai Kai Mhantai Sasubai: अगं बाई अरेच्चा, जाऊ बाई जोरात, नवरा माझा नवसाचा यांसारख्या अनेक विनोदी सिनेमात आणि मालिकांमध्ये अभिनेत्री निर्मिती सावंत यांनी दमदार भूमिका बजावली. निर्मिती यांनी फक्त चाहत्यांच्या मनावर नाही तर, मोठ्या पडद्यावर देखील राज्य केलं. कुमारी गंगुबाई नॉन मॅट्रिक, हप्ता बंद, कॉन्स्टेबल कामना कामतेकर या त्यांच्या मालिका विशेष गाजल्या. तर ‘झिम्मा’ सिनेमात आपल्या विनोदबुद्धीने प्रेक्षकांना पोट धरुन हसवल्यानंतर, ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ सिनेमातून त्या बाई म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत असताना ‘अगं अगं सुनबाई ! काय म्हणताय सासूबाई?’ सिनेमात निर्मिता सावंत सासूबाईंच्या भूमिकेत दिसत आहेत.
अगं अगं सुनबाई ! काय म्हणताय सासूबाई? सिनेमाला देखील प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सिनेमात अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने सूनेची भूमिका साकारली आहे. दोघींच्या सासू – सूनेच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतली. सध्या सर्वत्र सिनेमाची चर्चा सुरु असताना, निर्मिती सावंत यांची खरी सून कोण याबद्दल देखील चर्चा रंगल्या आहेत. तुम्हाला माहिती आहे का? निर्मिती सावंत यांची खरी सून कोण आहे आणि ती काय करते?
अगं अगं सुनबाई ! काय म्हणताय सासूबाई? सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर निर्मिती सावंत यांची खरी सून कोण? याबद्दल देखील चर्चा रंगू लागल्या आहेत. निर्मिती सावंत यांच्या मुलाबद्दल सांगायचं झालं तर, त्यांचा मुलगी अभिनय सावंत देखील अभिनय विश्वात सक्रिय आहे . आतापर्यंत त्याने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.
अभिनय याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनव याने पूर्वा पंडित हिच्यासोबत लग्न केलं आहे. सोशल मीडियावर देखील निर्मिती सावंत हिने पूर्वासोबत अनेक फोटो आहेत. पूर्वा कायम सासूसोबत फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. पूर्वा हिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ती एक डूडल आर्टिस्ट आहे. तिची स्वतःची एक डूडल कंपनी देखील आहे. पूर्वा स्वतः डूडल्स तयार करते.