3 वर्षांपासून एकही चित्रपट नाही, तरीही 949 कोटींची मालकीण, नवऱ्यापेक्षा 3 पट अधिक संपत्ती, कोण आहे ती?

बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री, जी गेल्या 3 वर्षांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीपासून दूर राहून देखील आहे 949 कोटी रुपयांची मालकीण. नवऱ्यापेक्षा तीन पट अधिक आहे संपत्ती. कोण आहे ही अभिनेत्री?

3 वर्षांपासून एकही चित्रपट नाही, तरीही 949 कोटींची मालकीण, नवऱ्यापेक्षा 3 पट अधिक संपत्ती, कोण आहे ती?
Image Credit source: Social media
| Updated on: Nov 01, 2026 | 5:16 PM

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही 1 नोव्हेंबर 2026 रोजी आपला 53 वा वाढदिवस साजरा करत आहे. मिस वर्ल्डचा किताब जिंकण्यापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय सिनेसृष्टीची ओळख निर्माण करण्यापर्यंत ऐश्वर्याचा प्रवास उल्लेखनीय राहिला आहे. विशेष म्हणजे, गेल्या अनेक वर्षांपासून ती हिंदी चित्रपटांमध्ये दिसलेली नाही. तरी तिच्या संपत्तीत आणि लोकप्रियतेत घट न होता वाढ होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्याची एकूण संपत्ती जवळपास 949 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.

ऐश्वर्या रायने 1994 मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकून जगभरात लोकप्रियता मिळवली. त्यानंतर तिने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली. 2004 मध्ये टाइम मॅगझिनच्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत तिचा समावेश झाला. 2009 मध्ये भारत सरकारने तिला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. तर 2012 मध्ये फ्रान्स सरकारकडून तिला ‘ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स’ हा सन्मान मिळाला.

Loading...

जाहिरातींमधून होते कोट्यवधींची कमाई

चित्रपटांपासून दूर असूनही ऐश्वर्याची कमाई सुरूच आहे. तिची जगभरातील लोकप्रियता आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड्ससोबत असलेले संबंध यामुळे जाहिरात क्षेत्रात तिची मोठी मागणी आहे. रिपोर्ट्सनुसार, ती एका ब्रँडच्या जाहिरातीसाठी सुमारे 6 ते 7 कोटी रुपये मानधन घेते. तर विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी 1.6 ते 2.5 कोटी रुपयांपर्यंत फी आकारत असल्याचे सांगितले जाते.

2023 मध्ये ‘पोन्नियिन सेल्वन’च्या काळात ती एका चित्रपटासाठी 10 ते 12 कोटी रुपये मानधन घेत असल्याची चर्चा होती. ऐश्वर्याच्या कमाईचा मोठा हिस्सा आंतरराष्ट्रीय सौंदर्य प्रसाधनांच्या ब्रँडसोबत असलेल्या दीर्घकालीन भागीदारीतून येत असल्याचे सांगितले जाते. ती अनेक देशांमध्ये या ब्रँडची अॅम्बेसेडर आहे. याशिवाय स्वित्झर्लंडमधील एका प्रसिद्ध लक्झरी घड्याळ कंपनीसोबतही ती अनेक वर्षांपासून जोडलेली आहे.

पती अभिषेक बच्चनपेक्षा तिप्पट संपत्ती?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्या रायची संपत्ती जवळपास 100 मिलियन डॉलर म्हणजेच 949 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. दुसरीकडे, तिचा पती आणि अभिनेता अभिषेक बच्चन याची संपत्ती सुमारे 33 ते 34 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 322 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. अभिषेकची कमाई अभिनय, चित्रपट निर्मिती आणि व्यावसायिक गुंतवणुकीतून होते. याशिवाय तो जयपूर पिंक पँथर्स या कबड्डी संघाचाही मालक आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us