AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO: आता व्हॉट्सअपवर मिळणार पीएफ सेवा, जुन्या खात्यांचा होणार आपोआप निपटारा…

कर्मचारी भविष्य निधी संघटना आपल्या 74 व्या स्थापना दिवसानिमित्त सदस्यांना दोन मोठी गिफ्ट देणार आहे. त्यातील एक म्हणजे आता व्हॉट्सअपवर पीएफची सेवा मिळणार आहे.

EPFO: आता व्हॉट्सअपवर मिळणार पीएफ सेवा, जुन्या खात्यांचा होणार आपोआप निपटारा...
epfo
| Updated on: Nov 01, 2026 | 5:12 PM
Share

EPFO : कोट्यवधी नोकरपेशा मंडळींना आता त्यांच्या पीएफशी संबंधित काम करणे आता आधीपेक्षा सोपे होणार आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO)आपल्या कोट्यवधी सदस्यांना दिलासा देण्यासाठी दोन खास पावले सुरु करण्याच्या तयारीत आहे. पहिले पाऊल म्हणजे आता लोकांना व्हॉट्सअपद्वारे पीएफशी संबंधित सर्व सेवा मिळणार आहे. दुसरे पाऊल म्हणजे त्यांची जुनी बरीच वर्षे बंद पडलेली खाती ज्यात एक हजार रुपयांपर्यंतचे बॅलन्स आहे त्यांचे ऑटोमेटिक सेटलमेंट केले जाणार आहे.

रविवार, 1 नोव्हेंबर 2026 रोजी दिल्लीत संघटनेचा 74 वा स्थापना दिवस साजरा केला जात आहे. प्रेस सूचना ब्युरोने (PIB) जारी केलेल्या माहितीनुसार केंद्री श्रम आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया हे या खास कार्यक्रमाची सुरुवात करणार आहे. या मंचावरुन कोट्यवधी पीएफ सदस्यांसाठी या दोन नव्या सुविधांना लाँच केले जात आहे. सदस्यांना पीएफची सुविधा सहज मिळावी याकडे संघटनेचे संपूर्ण लक्ष आहे. याशिवाय छोट्या आणि दीर्घकाळापासून बंद पडलेल्या खात्यांचा निपटारा करण्याचे काम देखील विना कटकटीने पूर्ण होऊ शकेल.

छोट्या पीएफ खात्यांचा आपोआप निपटारा

नेहमी लोक नोकरी बदलल्यानंतर आपल्या जुन्या पीएफ खात्यात असलेल्या छोट्या रक्कमेला विसरुन जातात. वा प्रक्रिया दीर्घ असल्याने हे पैसे काढत नाहीत. आताच्या नियमानुसार अशा बंद पडलेल्या पीएफ खात्यातील पैसे काढण्यासाठी सदस्यांना स्वतंत्रपणे संपूर्ण सेटलमेंट प्रक्रियेतून जावे लागते.

ईपीएफओच्या नव्या पावलाने अशा पात्र सदस्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. ज्यांच्या दीर्घकाळापासून बंद पडलेल्या खात्यात 1000 रुपयांपर्यंत छोटी रक्कम जमा आहे. या नव्या व्यवस्थेचा थेट हेतू प्रक्रियेला सरळ बनवणे आहे. याच्या लागू झाल्यानंतर पात्र सदस्यांना आपली छोटी रक्कम काढण्यासाठी वा खाते बंद करण्यासाठी कोणत्याही दीर्घ कागदी प्रक्रियेला सामोरे जावे लागणार नाही. मात्र, पीआयबीच्या प्रेस रिलीजमध्ये अद्याप हे स्पष्ट केलेले नाही की या नव्या सुविधेसाठी पात्रतेच्या संपूर्ण अटी काय असतील. तसेच ऑटोमेटिक सेटलमेंटचे काम कोणत्या तारखेपासून सुरु होमार याचीही माहिती समोर आलेली नाही.

व्हॉट्सअपद्वारे सोपा होणार पीएफचा मार्ग

डिजिटल काळात आपल्या सदस्यासोबत संपर्क बनवण्यासाठी संघटना आता व्हॉट्सअपची मदत घेणार आहे. ही सुविधा सुरु झाल्यानंतर पीएफ खातेधारकांना आपल्या सुविधांपर्यंत पोहचण्यासाठी एक नवीन आणि सोपे माध्यम मिळणार आहे. यामुळे ईपीएफओची सेवा आधीच्या तुलनेत खूपच सुविधाजनक होणार आहेत.

पीएफशी संबंधित माहिती घेण्यासाठी सदस्यांच्या जवळ व्हॉट्सअपच्या रुपात एक थेट पर्याय उपलब्ध असणार आहे. मात्र, संघटनेने आतापर्यंत हे सांगितलेले नाही की व्हॉट्सअपवर कोणती सुविधा मिळणार आहे. सदस्य कोणत्या प्रक्रियेद्वारे या सेवांचा वापर करु शकणार, याची संपूर्ण माहिती बाहेर येणे शिल्लक आहे.

Follow Us
नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव...
Tejashwi Yadav : नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव यांचा थेट सवाल
शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही....
Eknath Shinde : शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी ग्वाही
शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती...
Ram Purnekar : शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती; राम पूर्णेकर असं का म्हणाले?
दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले...
Tukaram Munde FDA : दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले लाडू-चिवडे; विक्रेत्यांना दिला इशारा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस्वरूपी सुरक्षा देण्याची विनंती
इंडिया अघाडीच्या रॅलीतून भाजप सरकारवर सडकून टीका
Delhi INDIA Alliance Rally : इंडिया अघाडीच्या रॅलीतून भाजप सरकारवर सडकून टीका
ज्ञानेश कुमार यांना हटवेपर्यंत आंदोलन थांबणार नाही...
Delhi INDIA Alliance Rally : ज्ञानेश कुमार यांना हटवेपर्यंत आंदोलन थांबणार नाही... राहुल गांधींचा निर्धार; रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची महारॅली
कसरच सोडली नाही, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं; थेट बड्या...
कसरच सोडली नाही, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं; थेट बड्या नेत्यांची नावं घेत केला घणाघात
एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात; कलम 370 वरून साधला निशाणा!
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात; कलम 370 वरून साधला निशाणा!
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत..
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन