ओटीटीवर कुणाचा बोलबाला, टॉप 10 मध्ये AK Vs AK?

| Updated on: Jan 09, 2021 | 1:12 PM

अनिल कपूर (Anil Kapoor) आणि अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांचा चित्रपट AK Vs AK हा प्रेक्षकांना खूप आवडला आहे.

ओटीटीवर कुणाचा बोलबाला, टॉप 10 मध्ये AK Vs AK?
Follow us on

मुंबई : अनिल कपूर (Anil Kapoor) आणि अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांचा चित्रपट AK Vs AK  प्रेक्षकांना खूप आवडला आहे. नेटफ्लिक्सने (Netflix) च्या म्हणण्यानुसार, एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत 40 पेक्षा जास्त देशांमध्ये नेटफ्लिक्सवर येऊन हा चित्रपट प्रेक्षकांनी पाहिला आहे. आता या चित्रपटाविषयी एक मोठी बातमी समोर येत आहे. असे म्हटले जात आहे की, जगातील 10 देशांमध्ये सर्वाधिक बघितल्या जाणाऱ्या पाहिल्या 10 चित्रपटांच्या यादीमध्ये AK Vs AK चित्रपटाचा समावेश झाला आहे.(AK Vs AK included in the movie Top 10)

AK Vs AK हा चित्रपट वादात सापडली होता. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर यामधील काही दृश्यामध्ये ट्रेलरमध्ये हा वाद निर्माण झाला होता. भारतीय हवाई वायुसेनेचे म्हणणे होते की, व्हिडिओमध्ये भारतीय वायुसेनेचा गणवेश चुकीचा पध्दतीने परिधान केला आहे. तसेच, गणवेश घालून वापरलेली भाषा योग्य नाही. हे भारताच्या सशस्त्र दलातील वर्तणुकीला सुसंगत नाही. संबंधित देखावे मागे घावे असे भारतीय हवाई वायुसेनेचे म्हणणे होते.

आर्मीच्या थीमवर कोणताही चित्रपट, माहितीपट किंवा वेब सीरीज प्रसारित होण्यापूर्वी प्रॉडक्शन हाऊसला मंत्रालयाकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेण्याचा सल्ला देण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले होते. सैन्यात अधिकारी आणि लष्करी गणवेशाचा अवमान केल्याच्या तक्रारी मंत्रालयाला आल्या असून त्यानंतर मंत्रालयाने आक्षेप घेतल्याचेही या पत्रात म्हटले होते. एवढेच नव्हे तर संरक्षण मंत्रालयाने माहिती व प्रसारण मंत्रालयाला एक पत्रही लिहिले होते.

संबंधित बातम्या : 

Special Story : सोनू सूदला अनधिकृत बांधकाम भोवणार?; जाणून घ्या, नेमकं काय आहे प्रकरणं?

Fraud | रितेश देशमुख इन्स्टाग्रामच्या सायबर फ्रॉडचा शिकार होताना थोडक्यात वाचला, फॅन्ससाठी हा महत्त्वाचा संदेश

Fitness Goal | हृदयविकाराचा धक्काही रेमो डिसूझाला रोखू शकला नाही, पुन्हा एकदा कसरती सुरु!

(AK Vs AK included in the movie Top 10)