
भोजपुरी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी यावर्षी प्रचंड यश संपादीत केलं आहे. विशेष म्हणजे 2024 या वर्षात अनेक नवीन चेहऱ्यांनी या क्षेत्रात पदार्पण केलं. यातील काही अभिनेत्रींनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं, तर काहींनी हिंदीतून तर बाकीच्यांनी प्रादेशिक भाषांच्या चित्रपटसृष्टीतून या इंडस्ट्रीत आपलं नशीब आजमावलं.

आकांक्षा पुरी या अभिनेत्रीने बॉलिवूड आणि टीव्ही मालिकांमध्ये चांगलं काम केलं. यानंतर तिने भोजपुरी चित्रपटसृष्टीत आपलं नशीब आजमावलं. विशेष म्हणजे ती इथे यशस्वी देखील झाली आहे. तिची सुपरस्टार खेसारी लाल यादवसोबतची जोडी प्रेक्षकांकडून खूप पसंत केली जात आहे. तिने खेसारी लालसोबत एक म्युझिक व्हिडिओ केला आहे. तिच्या या गाण्याची सोशल मीडियावर चांगलीच हवा आहे.

भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीचा पॉवर स्टार पवन सिंहचा 'अपना राजा जी' म्युझिक व्हिडिओ 22 ऑक्टोबरला प्रदर्शित झाला. या म्युझिक व्हिडिओमध्ये इशानी घोष ही अभिनेत्री दिसली होती. तिचं काम प्रेक्षकांना चांगलंच आवडलं. यानंतर आता भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील या पॉवर स्टारसोबत इशानी लवकरच 'मोहरा' चित्रपटात दिसणार आहे.

भोजपुरी इंडस्ट्रीतील अभिनेत्री मेघश्री हिने चांगल नावलौकिक कमावलं आहे. तिने 'बोल राधा बोल', 'संघर्ष 2', 'फरिश्ता', 'राउडी इन्स्पेक्टर' सारख्या हिट चित्रपटांसह भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. भोजपुरी चित्रपटसृष्टीत काम करण्यापूर्वी ती दक्षिण चित्रपटसृष्टीत सक्रिय होती.

बंगाली चित्रपटसृष्टीत आपली जादू दाखवल्यानंतर अभिनेत्री स्नेहाने भोजपुरी चित्रपटांमध्ये पदार्पण केलं. स्नेहाचे 2024 मध्ये अनेक म्युझिक व्हिडिओ हिट झाले आहेत. स्नेहा तिच्या अभिनयासोबतच तिच्या नृत्यासाठीही ओळखली जाते.

भोजपुरी अभिनेत्री प्रीती पासवानने आपल्या नृत्याने बिहारच नाही तर संपूर्ण देशाला वेड लावले आहे. अरविंद अकेला कल्लूसोबतची तिची जोडी लोकांना खूप आवडते.