Akshara Singh: अक्षरा सिंहचा नवा व्हिडीओ Social Media वर व्हायरल

सोशल नव्याने व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्येअक्षरा टीव्ही अभिनेता करण खन्ना सोबत डान्स करताना दिसून येत आहे. या व्हिडिओला जवळपास 35 हजार होऊन अधिक लोकांनी लाईक्स केले आहे.

Akshara Singh: अक्षरा सिंहचा नवा व्हिडीओ Social Media वर व्हायरल
Akshara Singh
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 23, 2022 | 10:40 PM

सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेल्या अभिनेत्रीमध्ये भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंहचा (Akshara Singh)नंबर लागतो. भोजपुरी सिनेमातील सर्वात महागडी अभिनेत्री म्हणून तिला ओळखले जाते. सोशल मीडियावर (Social Media) कायमच ती आपले फोटो व्हिडीओ शेअर करताना दिसून येत असते. काही दिवसांपूर्वी ती तिच्या एमएमएस(MMS) मुळे चर्चेत आली होती. मात्र हा व्हिडीओ आपला नसल्याचे तिने अनेक मुलाखतीत स्पष्ट केलं होत. यानंतर आता तिचा डान्स करतानाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर नव्याने व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अक्षरा टीव्ही अभिनेता करण खन्ना सोबत डान्स करताना दिसून येत आहे. तीन – चार तासांपूर्वी पोस्ट केलेल्या या व्हिडिओला जवळपास 35 हजार होऊन अधिक लोकांनी लाईक्स केले आहे. तसेच तिच्या चाहत्यांनी हार्ट व इमोजी शेअर करत तिचे कौतुकही केलं आहे. जवळपास 300 हून अधिक लोकांनी यावर कमेंट केल्या आहेत. तिच्या या व्हिडिओवर करणनेही कमेंट केली आहे.

या व्हिडीओमध्ये अक्षरा करण खन्नाच्या सोबत ट्विनिंग करताना दिसत आहे. या बरोबरच दोघांनीही सेम रंगाचे आऊटफीट घातले आहेत. दोघांनीही डेनिम जीन्स व काळया रंगाचा टीशर्ट घातला आहे.

अक्षराने पांढऱ्या तर करणने पांढऱ्या रंगाचे शूज घातले आहेत. या व्हिडीओला कॅप्शन देताना अक्षराने लिहिले आहे की 90 च्या दशकातील गाणी कायमच हिट राहतील, या व्हिडिओतील गाण्यात दोघांच्या स्टेप्सही एकासारख्यास असलेल्या दिसून आल्या आहेत. हे ट्रेंडिंग आहे असे म्हणत तिने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.