AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अक्षय कुमार सोबत काम करणार कळताच अक्षरा सिंगची भन्नाट रिॲक्शन, म्हणाली – मी 5 वेळा ..

'वेलकम टू द जंगल' या चित्रपटाचा ट्रेलर 11 जून रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात अक्षय कुमार, राजपाल यादव, दिशा पटानी, रवीना टंडन आणि भोजपुरी स्टार अक्षरा सिंग यांचा समावेश आहे. या चित्रपटाद्वारे अक्षरा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असून, तिने अक्षय कुमारसोबत 'घिस घिस घिस' हे भोजपुरी-हिंदी गाणे सादर केलंय. तिने एक भन्नाट किस्सा सांगितला.

अक्षय कुमार सोबत काम करणार कळताच अक्षरा सिंगची भन्नाट रिॲक्शन, म्हणाली - मी 5 वेळा ..
अभिनेत्री अक्षरा सिंग
| Updated on: Jun 12, 2026 | 3:55 PM
Share

‘वेलकम टू द जंगल’ या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच (11 जून) लाँच झाला. यावेळी चित्रपटाची संपूर्ण कास्ट एकत्र दिसली. या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चच्या वेळी अक्षय कुमार, राजपाल यादव, दिशा पटानी, रवीना टंडन आणि इतर कलाकारांसोबत भोजपुरी स्टार अक्षरा सिंग ही देखील दिसून आली. या चित्रपटातील एका गाण्याद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटात अक्षरा सिंग आणि अक्षय कुमार यांच्यावर चित्रित केलेलं ‘घिस घिस घिस’ (Ghis Ghis Ghis) हे अतिशय उत्साही भोजपुरी-हिंदी गाणं आहे. प्रेक्षकांकडून या गाण्याला मोठी पसंती मिळत असून सध्या ते यूट्यूबवर चांगलंच गाजत आहे, ट्रेंडही करत आहे. ट्रेलर लॉन्चच्या कार्यक्रमात अक्षराने तिच्या गाण्याबद्दल भाष्य केले. तिने अक्षयसोबत डान्सही केला.

काय म्हणाली अक्षरा ?

यावेळी अक्षराला एक सवाल विचारण्यात आला. अक्षय कुमार सोबत तुला हा चित्रपट, गाणं ऑफर झालं, तेव्हा तुझी प्रतिक्रिया कशी होती ? त्यावर अक्षरा जे बोलली ते ऐकून सगळेच अवाक झाले. ती म्हणाली ( ऑफरबद्दल ) ते ऐकताच मी तर 5 वेळा वॉशरुमला जाऊन आले. मी एवढी एक्सायटेड होते. कारण माझ्यासाठी हे (अक्षयकुमारसोबत काम करणं) स्वप्नवतच होत. मी लहानपणापासूनच ‘सरांना’ पाहत आले आहे. त्यांचं “मैं खिलाडी तू अनाडी” हे गाणं बिहारमधील प्रत्येक मुलाच्या अगदी काळजात रुजलेलं आहे. म्हणूनच, माझ्यासाठी ही एक खूप मोठी संधी होती, असं अक्षरा म्हणाली.

‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच दरम्यान अक्षरा हिने अक्षय कुमारसोबत डान्सही केला. बॉलिवूड कलाकारांच्या मांदियाळीत अक्षरा सिंगने आपल्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हा आनंदाचा क्षण तिच्यासाठी अत्यंत भावूक करणारा होता; बॉलिवूडमधील तिच्या पदार्पणाचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होता.

कधी रिलीज होणार चित्रपट ?

‘वेलकम टू द जंगल’ (Welcome to the Jungle) या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर 29 जून रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाद्वारे अनेक वर्षांनंतर अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांची जोडी पाहायला मिळणार आहे; 90 च्या दशकात अतिशय हिट जोडी असलेल्या, या दोन कलाकारांना पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र पाहणं चाहत्यांसाठी खूपच आनंदाचं ठरेल. अनेक बड्या कलाकारांचा समावेश असलेल्या या चित्रपटाकडून बॉक्स ऑफिसवर मोठ्या कमाईची अपेक्षा आहे. मात्र प्रदर्शनानंतर प्रेक्षकांकडून या चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Follow Us
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या...
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज नेत्या पोहोचल्या भेटीला
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?