‘रात्री तू फ्रीजमध्ये झोपते वाटतं’, अभिनेत्रीला पाहून अक्षय कुमार असं का म्हणाला

एका मुलाखतीमध्ये अक्षय कुमारने एका अभिनेत्रीला पाहून 'रात्री तू फ्रीजमध्ये झोपते वाटतं' असे म्हटले आहे. आता अक्षय असं का म्हणाला चला जाणून घेऊया...

रात्री तू फ्रीजमध्ये झोपते वाटतं, अभिनेत्रीला पाहून अक्षय कुमार असं का म्हणाला
Akshay kumar And Madhu
Image Credit source: Social Media
| Updated on: Feb 28, 2025 | 3:56 PM

बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार हा कायम चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून त्याने भलेही एकापाठोपाठ एक फ्लॉप सिनेमे दिले असले तरी अक्षयच्या प्रत्येक भूमिकेची विशेष चर्चा रंगते. सध्या अक्षय त्याचा आगामी सिनेमा ‘कनप्पा’चे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. या प्रोमोशनदरम्यान, त्याने एका अभिनेत्रीला पाहून ‘रात्री तू फ्रीजमध्ये झोपते वाटतं’ असे म्हटले आहे. अक्षय कोणाला असं म्हणाला आणि का म्हणाला? असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया त्याविषयी…

अक्षय कुमारच्या ‘कनप्पा’ चित्रपटाच्या दुसऱ्य़ा ट्रेलर लाँचच्या वेळी एक मीडिया इवेंटमध्ये अभिनेत्री मधुने हजेरी लावली होती. अक्षय आणि मधु यांनी ऐलान आणि जामिल या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यानंतर आता पुन्हा मधु समोर आल्याने अक्षयने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच तिच्यासोबत या मुलाखतीमध्ये गप्पा मारल्या आहेत.

अक्षय या कार्यक्रमात म्हणाला की, ‘मधूला भेटून आज मला खूप आनंद झाला आहे. मी त्याच्यासोबत ऐलान आणि जालिम या चित्रपट काम केले होते. दोन्ही चित्रपट खास होते आणि त्यामुळेच आजही या चित्रपटांच्या आठवणी माझ्या मनात ताज्या आहेत.’ पुढे त्याने असेही सांगितले की तो २० वर्षांनी मधूला भेटत आहे आणि ती अजिबात बदललेली नाही. अक्षय गंमतीने मधुला म्हणाला की, ‘तू आजही तशीच दिसतेस, असं वाटतं रोज रात्री फ्रीजमध्ये झोपतेस. त्यामुळेच तू इतकी फ्रेश दिसत आहेस.’

गुड्डू धनोआ दिग्दर्शित ‘ऐलान’ हा चित्रपट १९९४ साली प्रदर्शित झाला होता. अक्षय कुमार आणि मधुसोबत या चित्रपटात अमरीश पुरी, फरीदा जलाल, देवेन वर्मा, मोहनीश बहल हे बडे कलाकार दिसले होते. चित्रपटाची कथा एसीपी रमाकांत यांच्या मुलाची हत्या आणि त्यांच्या लहान मुलाने कायदा हातात घेण्याचा केलेला प्रयत्न याभोवती फिरते. तसेच ‘जालीम’ हा एक क्राइम ड्रामा होता, ज्यामध्ये अक्षय कुमार आणि मधुसोबत विष्णुवर्धन व आलोक नाथ देखील मुख्य भूमिकेत होते.