कोट्यावधींची डील,अक्षय कुमार मालामाल; मुंबईतील अजून एक आलिशान फ्लॅट विकला

काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी त्यांचा मुंबईतील ओशिवरा येथील ड्युप्लेक्स अपार्टमेंट 83 कोटींना विकल्याची माहिती समोर आली होती. या यादीत आता अभिनेता अक्षय कुमारचंही नाव आलं आहे. कारण अक्षय कुमार-ट्विंकल खन्ना यांनी त्यांचा मुंबईतील आणखी एक फ्लॅट विकला आहे. या फ्लॅटच्या विक्रितून अक्षयला बक्कळ पैसा मिळाला आहे. विक्रिची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसेल.

कोट्यावधींची डील,अक्षय कुमार मालामाल; मुंबईतील अजून एक आलिशान फ्लॅट विकला
| Updated on: Feb 10, 2025 | 2:25 PM

काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी त्यांचा मुंबईतील ओशिवरा येथील ड्युप्लेक्स अपार्टमेंट 83 कोटींना विकल्याची माहिती समोर आली होती. मालमत्ता नोंदणी कागदपत्रांनुसार, बिग बींनी हे अपार्टमेंट एप्रिल 2021 मध्ये 31 कोटी रुपयांना खरेदी केले होते. त्यांनी ते 83 कोटी रूपयांना विकलं. आता बॉलिवूडचा खिलाडीकुमार अक्षय कुमारनेही त्याचा मुंबईतील एक आलिशान फ्लॅट विकला आहे.

अक्षय कुमारने विकला मुंबईतील अजून एक आलिशान फ्लॅट

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने मुंबईतील वरळी परिसरातील एक आलिशान फ्लॅट विकला आहे. या विक्रीतून त्याला मोठा नफा झाल्याचं बोललं जातं. अक्षय कुमार आणि पत्नी ट्विंकल खन्ना यांनी हे अपार्टमेंट 80 कोटी रूपयांना विकल्याची माहिती समोर आली आहे. इंडेक्सटॅपच्या नियंत्रणात असलेल्या मालमत्तेच्या कागदपत्रांनुसार, अक्षय कुमार व ट्विंकल खन्ना यांचे अपार्टमेंट ओबेरॉय 360 पश्चिम प्रकल्पात 39 व्या मजल्यावर आहे. या फ्लॅटच्या बाल्कनीतून शहराचे विहंगम दृश्यही दिसतं.

80 कोटी रुपयांना विकला फ्लॅट

6,830 चौरस फूट इतकी या अपार्टमेंटची जागा आहे. अक्षय-ट्विंकलच्या अपार्टमेंटची प्रतिचौरस फूट किंमत 1.17 लाख आहे. या अपार्टमेंटला चार कार पार्किंगचीसुद्धा जागा आहे. 31 जानेवारीला नोंदणी केलेल्या कागदपत्रांनुसार 4.80 कोटी रूपये मुद्रांक शुल्क म्हणून भरण्यातही आल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान 31 जानेवारी 2025 रोजी या फ्लॅटच्या विक्रीचा अंतिम करार झाला. पल्लवी जैन नावाच्या महिलेनं हा फ्लॅट विकत घेतल्याचं म्हटलं जात आहे. या फ्लॅटची स्टॅम्प ड्युटी 4.8 कोटी रुपये भरण्यात आली. अक्षय कुमारने हा फ्लॅट तब्बल 80 कोटी रुपयांना विकला आहे. अक्षयला या फ्लॅट विक्रितून प्रचंड नफा झाला आहे.

अक्षय कुमारव्यतिरिक्त या सेलिब्रिटींचेही आहेत तिथे आलिशान फ्लॅट 

अक्षय कुमार-ट्विंकल खन्ना यांच्याशिवाय ओबेरॉय 360 पश्चिम प्रकल्पात अन्य काही बॉलीवूड कलाकारांचेही सोई-सुविधांनी युक्त असे अपार्टमेंट आहे. त्यामध्ये शाहिद कपूर, अभिषेक बच्चन यांचा समावेश आहे. शाहिद कपूर व मीरा कपूर यांनी मे 2024 मध्ये 5,395 चौरस फूट कार्पेट एरिया असलेले अपार्टमेंट खरेदी केले होते. त्याची किंमत 60 कोटी इतकी होती. त्यानंतर डीमार्टचे राधाकृष्ण दमानी, एव्हरेस्ट मसाला ग्रुपचे प्रवर्तक वृतिका गुप्ता, यांचेही आलिशान फ्लॅट्स आहेत.

अक्षय कुमारने त्याची आणखी एक मालमत्ता विकली होती

गेल्या वर्षी अक्षय कुमारने बोरिवली येथील स्काय सिटीमधील त्याचे अपार्टमेंट 4.25 कोटी रुपयांना विकले होते. 2017 मध्ये त्याने हे अपार्टमेंट 2.37 कोटी रुपयांना खरेदी केले होते. या विक्रीतून त्याला 78 टक्के नफा झाला होता. आता विकलेल्या फ्लॅटमध्येही त्याला बक्कळ पैसा मिळाला आहे.