Dhurandhar 2 : ओटीटीवर ‘धुरंधर 2’ची जादू पडली फिकी; ‘या’ धमाकेदार सिनेमाने टाकलं मागे
Dhurandhar 2 : अभिनेता रणवीर सिंग याने 'धुरंधर' आणि 'धुरंधर 2' सिनेमातून फक्त चाहत्यांच्या मनावर राज्य केलं नाही तर, बॉक्स ऑफिसवर देखील तगडी कमाई केली. पण आता सिनेमााची जादू फिकी पडली असून, एक धमाकेदार सिनेमाने रणवीरच्या 'धुरंधर 2'ला मागे टाकलं आहे.

Dhurandhar 2 : अभिनेता रणवीर सिंग स्टरार ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर 2’ सिनेमाने यंदाचं वर्ष गाजवलं आहे. फक्त भारतातच नाही तर, परदेशात देखील सिनेमाच्या दोन्ही भागांचा बोलबाला पाहायला मिळाला. बॉक्स ऑफिस तगडी कमाई करत ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर 2’ सिनेमाने अनेक रेकॉर्ड ब्रेक करत नवीन विक्रम रचले… चाहत्यांनी रणवीर याने साकारलेल्या भूमिकेला देखील डोक्यावर घेतलं. सर्वत्र फक्त आणि फक्त ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर 2’ सिनेमाची चर्चा होती. पण आता ‘धुरंधर 2’ सिनेमाची जादू फिकी पडली आहे. ‘धुरंधर 2’ सिनेमाचं जे स्थान होतं ते आता दुसऱ्या एका दमदार सिनेमाने घेतलं आहे. त्यामुळे ‘धुरंधर 2’ सिनेमा शर्यतीत मागे पडला आहे.
चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर ‘धुरंधर 2’ सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील प्रदर्शित करण्यात आला. नेटफ्लिक्सवर देखील सिनेमाने एन्ट्री घेतली आहे. पण सिनेमात थोडे फार बदल करून ‘धुरंधर 2 नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आली. पण हा सिनेमा सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. अशात सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे, रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेल्या या ब्लॉकबस्टर सिनेमाला अभिनेता अक्षय कुमारच्या एका सिनेमाने जोरदार टक्कर दिली आहे.
एवढंच नाही तर, या सिनेमाने नेटफ्लिक्सच्या ‘टॉप 10’ सिनेमांच्या यादीत अव्वल स्थान पटकावलं आहे आणि तिथे आपलं स्थान सातत्याने टिकवून ठेवलं आहे. नेटफ्लिक्सवर आता रणवीर सिंग स्टारर ‘धुरंधर 2’ सिनेमाला अक्षय कुमार स्टारर ‘भूत बंगला’ सिनेमाला टक्कर देत आहे. ‘भूत बंगला’ सिनेमा 12 जून रोजी प्रदर्शित झाला आणि सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 200 कोटी रुपयांची कमाई केली.. हा सिनेमा आज देखील ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म्सवर मोठ्या प्रमाणावर पाहिला जात आहे; परिणामी, इतके दिवस उलटूनही नेटफ्लिक्सवर हा सर्वाधिक पाहिला जाणारा सिनेमा ठरला आहे.
नेटफ्लिक्सवरील टॉप 10 सिनेमे…
नेटफ्लिक्सवरील सध्याच्या टॉप 10 सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, ‘भूत बंगला’ पहिल्या स्थानावर आहे, तर ‘धुरंधर 2’ दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर, ‘व्हॉइस मेल फॉर इसाबेल’ तिसऱ्या, ‘मा-बहन’ चौथ्या, ‘हसबंड्स इन ॲक्शन’ पाचव्या आणि धनुषचा सिनेमा ‘कारा’ सहाव्या स्थानावर आहे. या यादीत उर्वरित सिनेमांमध्ये ’29’ सातव्या, ‘कर्तव्य’ आठव्या, ‘क्रिएटर’ नवव्या आणि ‘कलंक’ दहाव्या स्थानावर आहेत.