AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हजारो वर्षांपूर्वी फ्रिज नसताना लोक अन्न कसे सुरक्षित ठेवत होते? पद्धत ऐकून तुम्ही व्हाल हैराण

पूर्वी फ्रिज नसताना देखील आदिमानव हे अन्न कसे सुरक्षित ठेवत होते. पद्धत ऐकून तुम्ही देखील व्हाल चकित. आजही त्या पद्धती काही लोक वापरतात. जाणून घ्या सविस्तर

हजारो वर्षांपूर्वी फ्रिज नसताना लोक अन्न कसे सुरक्षित ठेवत होते? पद्धत ऐकून तुम्ही व्हाल हैराण
| Updated on: Aug 25, 2026 | 4:21 PM
Share

आजच्या काळात अन्न खराब होऊ नये यासाठी फ्रिजचा वापर जवळपास प्रत्येक घरात केला जातो. मात्र, हजारो वर्षांपूर्वी वीज आणि फ्रिजची सुविधा नसताना आदिमानव अन्न कसे सुरक्षित ठेवत असतील असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यावेळी मानवाने निसर्गातील उपलब्ध साधनांचा वापर करून अन्न जास्त काळ टिकवून ठेवण्याचे अनेक प्रभावी मार्ग शोधले होते.

थंड प्रदेशात राहणारे लोक बर्फ, बर्फाळ गुहा आणि नैसर्गिकरित्या थंड असलेल्या ठिकाणी मांस व इतर खाद्यपदार्थ साठवून ठेवत असत. काही ठिकाणी जमिनीत खोल खड्डे करून त्यामध्ये अन्न ठेवले जात असे. जमिनीखालील तापमान तुलनेने थंड आणि स्थिर असल्याने अन्न लवकर खराब होत नसे.

धूप आणि आगीच्या मदतीने वाळवणे

अन्न टिकवण्यासाठी ते उन्हात वाळवणे हीदेखील जुनी पद्धत होती. मांस, मासे आणि फळांचे पातळ तुकडे करून ते उन्हात किंवा आगीजवळ वाळवले जात. अन्नातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने त्यावर जीवाणू आणि बुरशी वाढण्याची शक्यता कमी होत असे. आजही अनेक पदार्थ वाळवण्यामागे याच तत्त्वाचा वापर केला जातो.

मीठाचा वापर सुरू झाल्यानंतर अन्न साठवण्याची आणखी एक प्रभावी पद्धत मानवाला मिळाली. मांस किंवा माशांना मोठ्या प्रमाणात मीठ लावल्याने त्यातील ओलावा कमी होतो आणि सूक्ष्मजीवांची वाढ रोखण्यास मदत होते. याच पद्धतीतून पुढे विविध प्रकारचे लोणचे, खारवलेले मासे आणि इतर टिकाऊ पदार्थ तयार करण्याची परंपरा विकसित झाली.

धुरात वाळवण्याची पद्धत

आगीचा वापर सुरू झाल्यानंतर मांस धुरात वाळवण्याची पद्धतही प्रचलित झाली. मांसाचे तुकडे आगीच्या वर टांगून त्यांना मंद उष्णता आणि धुराच्या संपर्कात ठेवले जात असे. यामुळे अन्नातील ओलावा कमी होण्यासोबतच धुरातील काही घटक सूक्ष्मजीवांची वाढ रोखण्यास मदत करत. त्यामुळे मांस तुलनेने जास्त काळ टिकत असे.

अन्न टिकवण्याची सर्वात आश्चर्यकारक पद्धत म्हणजे विशिष्ट प्रकारच्या दलदलींचा वापर. पीट बोग्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दलदलींच्या पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण अत्यंत कमी, तापमान थंड आणि विशिष्ट आम्लीय वातावरण असते. त्यामुळे काही सेंद्रिय पदार्थ दीर्घकाळ टिकून राहू शकतात. युरोपातील काही दलदलींमध्ये हजारो वर्षे जुने मांस आणि लोणी सापडल्याचे पुरातत्त्वीय संशोधनातून समोर आले आहे.

Follow Us
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन,
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन, गेल्या 24 तासांत नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच...
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी