AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भीक मागत मागत मृत्यू… घराची झडती घेताच सापडल्या 30 पोती नोटा अन् नाणी, एकूण खजिना… सर्वांनाच बसला धक्का

कर्नाटकमधील 68 वर्षीय भिकारी महिलेच्या निधनानंतर तिच्या घरात 30 हून अधिक पोत्यांमध्ये लाखोंची रक्कम आढळल्याने सर्वांना धक्का बसला. आयुष्यभर भीक मागून जगणाऱ्या या महिलेच्या घरात एवढे पैसे पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. पैशांची मोजणी करायला संपूर्ण दिवस लागला.

भीक मागत मागत मृत्यू... घराची झडती घेताच सापडल्या 30 पोती नोटा अन् नाणी, एकूण खजिना... सर्वांनाच बसला धक्का
| Updated on: Aug 25, 2026 | 4:13 PM
Share

Karnataka Beggar Woman : ज्या महिलेने उदरनिर्वासाठी आयुष्यभर लोकांसमोर हात पसरला, भीक मागितली, तिच्या मृत्यूनंतर मात्र तिच्या घराचा दरवाजा उघडताच आतलं दृश्य पाहून सगळ्यांनाच धक्का बसला ! कारण त्या घरात 1-2 नव्हे तर 30 हून अधिक पोती भरून पैसे ठेवलेले होते. हजारो नाणीही त्याच घरात सापडली. मांड्यातील 68 वर्षीय हूर यांच्या घरातून निघालेली ही रोकड मोजायला स्थानिकांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत वेळ लागला आणि अखेर समोर आली तब्बल 8 लाखापेक्षा जास्तीची रक्कम!

वाचून हैराण झालात ना ? पण हे खरं आहे, कर्नाटकच्या मांड्या जिल्ह्यातील गुथलू परिसरात राहणाऱ्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. हूर असं त्या महिलेचा नाव असून त्या 68 वर्षांच्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, हूर यांनी त्याचं संपूर्ण आयुष्य भीक मागून घालवलं होतं. त्या आपल्या बहिणीसोबत भाड्याच्या घरात राहत होत्या. मात्र, त्यांच्या बहिणीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले होते. दोघीही अविवाहित होत्या. हूर यांच्या मृत्यूची बातमी समजताच स्थानिक नागरिक आणि नातेवाईक त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी एकत्र आले. अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर काही लोकांनी त्यांच्या घराची झडती घेतली. आणि तिथलं दृश्य पाहून ते अक्षरश: स्तब्ध झाले. कारण त्या घरात एका मागोमाग एक अशा अनेक पोत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे आढळले आणि सर्वांनाच धक्का बसला.

सकाळपासून संध्याकाळपर्यंत मोजत होते पैसे

हूर यांच्या घरातून पांढऱ्या, निळ्या आणि पिवळ्या रंगाच्या 30 पेक्षा जास्त प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये पैसे सापडले. या पोत्यांमध्ये हजारो नाण्यांसह 10, 20 आणि 50 रुपयांच्या नोटा होत्या. ते पैसे एवढ्या मोठ्या प्रमाणात होते की, त्याची मोजणी करण्यासाठी स्थानिक नागरिक आणि नातेवाईकांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसावं लागलं. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओही समोर आला असून, त्यामध्ये लोक घरातील सामानाची तपासणी करताना आणि मोठ्या प्रमाणात पैसे मोजताना दिसले.

अखेर हूर यांच्या घरात एकूण 8 लाख 40 हजार रुपये सापडले, ती संपूर्ण रक्कम त्यांच्या दोन भावांना देण्यात आली. एका भावाने 6 लाख तर दुसऱ्या भावाने 2 लाख 40 हजार रुपये घेले. ते पैसे त्यांनी दान केल्याची माहिती समोर आली

Follow Us
‘स्कूल ठीक करो’ मोहिमे अंतर्गत CJP पदाधिकारी आणि दादा भुसे यांची भेट
मंत्री दादा भुसे आणि कॉकरोच जनता पार्टीची भेट
OBC आश्रमशाळांना इशारा; मूलभूत सुविधा न दिल्यास मान्यता रद्द
राज्यातील जिल्हा परिषद शाळा आणि आश्रमशाळांच्या दयनीय स्थितीवर मंत्र्यांची कठोर भूमिका
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट