माझ्या मुलांनी थेट पळून लग्न करावं; ट्विंकल खन्ना असं का म्हणाली?

जामनगरमध्ये पार पडलेल्या या प्री-वेडिंगसाठी अंबानींनी अमाप पैसा खर्च केला होता. तीन दिवसांपर्यंत हा कार्यक्रम सुरू होता आणि एके दिवशी मध्यरात्री 3 वाजेपर्यंत हा फंक्शन लांबत गेला होता. अंबानींच्या कार्यक्रमात फक्त अक्षयच नव्हे तर सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान यांनीसुद्धा डान्स केला होता.

माझ्या मुलांनी थेट पळून लग्न करावं; ट्विंकल खन्ना असं का म्हणाली?
Akshay Kumar and Twinkle Khanna with son
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 11, 2024 | 9:48 AM

मुंबई: 11 मार्च 2024 | अभिनेता अक्षय कुमारची पत्नी आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर ट्विंकलची उपरोधिक टिप्पणी विशेष चर्चेत येते. ट्विंकल सध्या चित्रपटांत कार्यरत नसली तरी लेखन क्षेत्रातील तिची कामगिरी उल्लेखनीय ठरतेय. एका वर्तमानपत्रात ट्विंकलचा लेख छापून येतो. या कॉलममध्ये नुकतीच ती लग्न या विषयावर व्यक्त झाली. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचा भव्यदिव्य सोहळा पार पडला होता. या कार्यक्रमाला देश-विदेशातील नामांकित व्यक्ती, सेलिब्रिटी सहभागी झाले होते. खुद्द अक्षय कुमारने अंबानींच्या कार्यक्रमात मध्यरात्री 3 वाजता डान्स परफॉर्म केला होता. मात्र लग्नसोहळ्याचा हा सर्व ताम-झाम पाहून आपल्या मुलांनी पळूनच लग्न करावं, अशी इच्छा ट्विंकलने व्यक्त केली. आरव आणि निताराने पळून लग्न करावं, असं तिने या कॉलममध्ये लिहिलंय.

‘माझ्या बहिणीने माझ्या विचारांमध्ये अडथळा आणलाय. तिने मला म्हटलं की, तू आडनावाबद्दल बोलतेय पण त्या सर्व गोष्टींचं काय ज्या आम्हाला सहन कराव्या लागतील? अंबानींच्या कार्यक्रमानंतर लग्नसोहळ्याची लेव्हल खूप वरपर्यंत सेट झाली आहे. त्यावर उत्तर देताना मी बहिणीला म्हटलं की, मी नीता वहिनीसारखा डान्स कधीच करू शकणार नाही. कोरोना महामारीच्या काळात जेव्हा मी ‘तम्मा तम्मा’ या गाण्यावर डान्स करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला वाटतं की देवाचीही इच्छा नव्हती की मी डान्स करावा. मी लगेच खाली पडली आणि माझा पाय फ्रॅक्चर झाला होता. मी आणि माझा पती रात्री 10 पर्यंत जागणंच खूप कठीण आहे. फक्त 20 लोकांच्या पार्टीचं आयोजन करतानाही आमच्या नाकीनऊ येतं. जर माझ्या मुलांना खरंच सुखी राहायचं असेल तर सर्वोत्कृष्ट म्हणजे त्यांनी पळूनच लग्न करावं’, असं ट्विंकलने लिहिलं.

Loading...

ट्विंकलने या लेखात अक्षयचीही मस्करी केली आहे. जामनगरमध्ये पार पडलेल्या अंबानींच्या प्री-वेडिंगमध्ये अक्षयने डान्स केला होता. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावर ट्विंकलने लिहिलं, ‘तो परफॉर्म करताना एकच स्टेप 33 वेळा रिपीट करत होता. प्रत्येक वेळी तो जबरदस्तीने अशी स्टेप करत होता, ते जणू मातीत आणखी एक तेलाची खाण खोदल्यासारखं होतं.’ ट्विंकल आणि अक्षयने 2001 मध्ये लग्न केलं. या दोघांना आरव हा मुलगा तर नितारा ही मुलगी आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us