8th Pay Commission: 2.92 ते 4 च्या दरम्यान ‘फिटमेंट फॅक्टर’ असल्यास मूळ वेतनात किती वाढ होऊ शकते? जाणून घ्या गणित
कर्मचारी संघटनांनी ८ व्या वेतन आयोगासाठी २.९२ ते ४ च्या दरम्यान 'फिटमेंट फॅक्टर'ची मागणी केली आहे. जर ही मागणी मान्य झाली. सध्याच्या मूळ वेतनाच्या आधारावर नवीन मूळ वेतन किती असू शकेल याच गणित जाणून घ्या.

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ८ व्या वेतन आयोगाबाबत सातत्याने अपडेट्स समोर येत आहेत. आता अलीकडेच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सध्या कर्मचारी संघटनांनी ‘फिटमेंट फॅक्टर’ बाबत विविध मागण्या मांडल्या आहेत. काही संघटना २.९२ इतक्या फिटमेंट फॅक्टरची मागणी करत आहेत, तर काहींनी ३.६१, ३.८३३ किंवा अगदी ४ इतक्या आकड्यांचेही प्रस्ताव दिले आहेत. जर यापैकी कोणतीही मागणी मान्य झाली, तर कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठा बदल होऊ शकतो. कर्मचाऱ्यांना जास्त फायदा होऊ शकतो. मात्र महत्त्वाचे म्हणजे, ८ व्या वेतन आयोगाच्या शिफारशींमध्ये कोणता फिटमेंट फॅक्टर समाविष्ट केला जाईल आणि शेवटी कोणता लागू केला जाईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. चला गणित जाणून घेऊयात…
फिटमेंट फॅक्टर’ म्हणजे काय?
फिटमेंट फॅक्टर चा वापर कर्मचाऱ्याच्या सध्याच्या मूळ पगारात वाढ करून त्यांचा नवीन मूळ पगार निश्चित करण्यासाठी केला जातो. उदाहरणार्थ, जर एखाद्या कर्मचाऱ्याचा सध्याचा मूळ पगार १८,००० रुपये असेल आणि फिटमेंट फॅक्टर ३.५ निश्चित केला असेल, तर त्यांचा नवीन मूळ पगार ६३,००० रुपये होईल. थोडक्यात सांगायचे तर, फिटमेंट फॅक्टर जितका जास्त असेल, तितकी नवीन मूळ पगारातील वाढही अधिक असेल.
कोणत्या ‘फिटमेंट फॅक्टर’ची मागणी केली जात आहे?
सध्या ८ व्या वेतन आयोगासमोर आपल्या मागण्या मांडल्या आहेत. या आयोगाला त्यांचा रिपोर्ट सादर करायचा आहे. विविध कर्मचारी आणि पेन्शनधारक संघटनांनी वेगवगेळ्या मागण्या केल्या आहेत. यामध्ये ‘इंडियन रेल्वे टेक्निकल सुपरवायझर्स असोसिएशन’, ‘नॅशनल कौन्सिल-जेसीएम’, ‘भारत पेन्शनर्स समाज’ आणि ‘भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ’ यांसारख्या संघटनांचा समावेश आहे. या संघटनांनी २.९२ ते ४ इतक्या फिटमेंट फॅक्टरची मागणी केली आहे.
बेसिक सॅलरी १८,००० हजार असलेल्याना किती रक्कम मिळेल?
सातव्या वेतन आयोगांतर्गत, लेव्हल-१ (Level-1) कर्मचाऱ्यांसाठी सुरुवातीचा मूळ पगार १८,००० इतका आहे. या आधारावर, विविध ‘फिटमेंट फॅक्टर’ वापरून केलेली गणना खालीलप्रमाणे आहे:
फिटमेंट फॅक्टर – नवीन मूळ पगार २.९२ -५२,५६० ३.६१ -६४,९८० ३.८३३- ६८,९९४ ४.०० -७२,०००
त्याचप्रमाणे, लेव्हल-६ (Level-6) साठी, सध्याच्या ३५,४०० या मूळ पगारावर २.९२ चा फिटमेंट फॅक्टर लागू केल्यास, नवीन मूळ पगार १,०३,३६८ होतो. ३.६१ च्या फिटमेंट फॅक्टरनुसार तो १,२७,७९४ होईल. ३.८३३ च्या फॅक्टरनुसार तो अंदाजे १,३५,६८८ असेल; आणि ४ च्या फॅक्टरनुसार तो १,४१,६०० पर्यंत पोहोचू शकेल.
