AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी सुप्रिया सुळे, नंतर प्रफुल्ल पटेल शरद पवार यांच्या भेटीला, काय घडतंय? मोठ्या हालचालींना वेग?

ज्येष्ठ नेते शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सुप्रिया सुळे यांच्यापाठोपाठ प्रफुल्ल पटेल यांनीही पवारांची भेट घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पक्षाच्या एकजुटीच्या शक्यतांवरून तर्कवितर्क लढवले जात आहेत.

आधी सुप्रिया सुळे, नंतर प्रफुल्ल पटेल शरद पवार यांच्या भेटीला, काय घडतंय? मोठ्या हालचालींना वेग?
praful patelImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 26, 2026 | 3:28 PM
Share

ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात अॅडमिट करण्यात आलं आहे. पवारांना डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पवारांना अॅडमिट केल्याचं कळताच खासदार सुप्रिया सुळे या तातडीने रुग्णालयात दाखल झाले. सुप्रिया सुळे यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेलही रुग्णालयात दाखल झाले. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. प्रफुल्ल पटेल अचानक रुग्णालयात आल्याने मोठ्या राजकीय घडामोडींची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात मोठ्या हालचालींना वेग येणार का? अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.

शरद पवार यांना आज दुपारी 12च्या सुमारास ब्रीच कँडीत आणण्यात आलं. पवार रुटीन चेकअपसाठी आल्याचं सांगितल्या गेलं. नंतर पवारांना प्रवासाची दगदग झाली असून त्यांना डिहायड्रेशनचा त्रास झाल्याचंही सांगितलं गेलं. पवारांना अॅडमिट केलं तेव्हा शरद पवार गटाची बैठक सुरू होती. या बैठकीला जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि अनिल देशमुख यांच्यासह इतर महत्त्वाचे नेते उपस्थित होते. ही बैठक सुरू असतानाच पवारांना अॅडमिट करण्यात आल्याची बातमी धडकली. त्यानंतर सुप्रिया सुळे या बैठकीतून तातडीने पवारांना भेटण्यासाठी निघाल्या. त्यावेळी रोहित पवारही बैठकीत होते. पण ते रुग्णालयाकडे गेले नाहीत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

पटेलही रुग्णालयात

सुप्रिया सुळे पवारांच्या भेटीला गेल्यानंतर काही वेळाने तिथे प्रफुल्ल पटेलही आले. यावेळी रुग्णालयात शरद पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे होत्या. त्यामुळे राजकीय वर्तुळात कुजबूज सुरू झाली आहे. पवार वेगळा निर्णय घेणार तर नाही ना? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? अशा चर्चा रंगल्या आहेत. रोहित पवारांचं बैठकीतच राहणं आणि पटेल यांचं शरद पवार यांच्या भेटीला जाणं यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. मागच्यावेळी शरद पवार अॅडमिट असताना पटेल दुसऱ्या दिवशी त्यांना भेटायला गेले होते. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यांना फोन करून प्रकृतीची विचारपूस करताना सुप्रिया आम्ही देश सांभाळतो, तुम्ही आराम करा, असा सल्ला दिला होता. त्यावेळीही राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. आता परत या राजकीय चर्चांना फोडणी मिळाली आहे.

सुनेत्रा पवारांवर टीका

दरम्यान, रोहित पवार हे कालपर्यंत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर बोलताना तोलून मापून बोलायचे. त्यांच्यावर थेट टीका करत नव्हते. मात्र, आज राजकीय घडामोडी घडत असताना रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्यावर उघड टीका केली आहे. सुनेत्रा पवार यांना अजितदादांसारखं काम करता येत नाही, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे. त्यामुळे रोहित पवार यांनी अचानक टीकेचा सूर आळवायला सुरुवात केल्यानेही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Follow Us
जपानचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ मुंबईत दाखल; राहुल नार्वेकरांसोबत बैठक
जपानचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ मुंबईत दाखल; राहुल नार्वेकरांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा, कारण काय?
शक्तीपीठ प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक! सलग तिसऱ्या दिवशीही जमीन मोजणी
शक्तीपीठ प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक! सलग तिसऱ्या दिवशीही जमीन मोजणी रोखली, पोलिसांशी झटापट
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला पुन्हा लांबणीवर; कारण काय?
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला पुन्हा लांबणीवर; सुनावणी पुढे ढकलली! कारण काय?
सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत मतांची चोरी? संविधान पायदळी तुडवल्याचा...
Solapur : सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत मतांची चोरी? धैर्यशील मोहिते पाटलांचा खळबळजनक आरोप; संविधान पायदळी तुडवल्याचा दावा
सुप्रिया सुळे तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयाकडे रवाना; शरद पवारांच्या...
सुप्रिया सुळे तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयाकडे रवाना; शरद पवारांच्या प्रकृतीबाबत दिली मोठी अपडेट!
धारावीकरांसाठी उद्धव ठाकरे मैदानात! अदानी प्रकल्पाविरोधात मोठं आंदोलन
धारावीकरांसाठी उद्धव ठाकरे मैदानात! अदानी प्रकल्पाविरोधात मोठं आंदोलन, नेमक्या काय आहेत मागण्या?
10 कोटींच्या मागणीचा व्हिडिओ व्हायरल, देवराम लांडेंचा राष्ट्रवादीला..
10 कोटींच्या मागणीचा व्हिडिओ व्हायरल, देवराम लांडेंचा राष्ट्रवादीला रामराम!
शिवरायांच्या गडकिल्ल्यांसाठी सरकारचा पुढाकार; एकनाथ शिंदेंनी सांगितला
शिवरायांच्या गडकिल्ल्यांसाठी सरकारचा पुढाकार; एकनाथ शिंदेंनी सांगितला खास संकल्प
पुणे कोर्टाबाहेरील हल्ल्यावेळी हल्लेखोरांची घोषणाबाजी; मंदार किवळे....
Pune : शुभम दादा, तुझ्या खुनाचा बदला घेतला... पुणे कोर्टाबाहेरील हल्ल्यावेळी हल्लेखोरांची घोषणाबाजी; मंदार किवळेंच्या जबाबातून धक्कादायक माहिती समोर
शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
Sharad Pawar : शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?