हा चित्रपट चालणार नाही, टीव्हीवर काम कर…; सलमानने अक्षयला आधीच दिला होता इशारा
सलमान खानने अक्षय ओबेरॉयला त्याच्या 'इसी लाइफ में' या पहिल्या चित्रपटाबाबत दिलेला सल्ला खरा ठरला. सलमानने त्यावेळीच चित्रपट फ्लॉप होईल असं सांगितलं होतं, जे खरं ठरलं. या अनुभवाने अक्षयला संघर्ष शिकवला आणि आता तो शाहरुख खानसोबत 'किंग' चित्रपटात झळकणार आहे.

Salman Khan advice to Akshay Oberoi : अभिनेता सलमान खान (Salman Khan) नेहमी चर्चेत असतो. त्याचा स्वॅग, त्याची स्टाईल याचे अनेक चाहते आहेत. बॉलिवूडमधले अनेक कलाकाराही त्याचे चाहते आहेत. आता नुकातच एका अभिनेत्याने सलमान बद्दल एक किस्सा सांगत मोठा खुलासा केला. जवळपास 16 वर्षांपूर्वी सलमा खानने एका न्यूकमरला सल्ला दिला होता, की तुझा (आगामी) चित्रपट चालणार नाही, त्यामुळे तू टीव्ही किंवा इतर काम कर. आणइ विशेष म्हणजे पिक्चर रिलीज झाल्यावर त्या अभिनेत्याचा चित्रपट खरंच फ्लॉप झाला. सलमानचं तेव्हाचं बोलणं अगदी खरं होतं, पण त्यला तेव्हा काहीच समजलं नाही. तो अभिनेता म्हणज अक्षय ओबेरॉय. 2010 साली ‘इसी लाइफ में’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षय हा, सलमान खानच्या ’10 का दम’ या टीव्ही शोमध्ये गेला होता. मात्र त्यावेळी सलमान जे बोलला, ते त्याच्यासाठी खूप धक्कादायक होतं. हा चित्रपट चालणार नाही, असं सलमान खानने त्याला सांगितलं. सलमानचा तो सल्ला मला तेव्हा तर समजू शकला नाही, पण तो चित्रपट खरंच फ्लॉप झाला.आणि त्यानंतर माझा संघर्ष सुरू झाला, कारण त्यानंतर मला इतर चित्रपट मिळायला खूप अडचणी आल्या, असं अक्षयने नमूद केलं.
सलमान खानच्या सल्ल्यावर काय म्हणाला अक्षय ओबेरॉय ?
एका इंटरव्ह्यूदरम्यान अमित भाटियाशी संवाद साधताना अक्षयने तो अनुभव सांगितला. आम्ही ’10 का दम ‘ शोमध्ये जाऊन आमचा पिक्चर प्रमोट करत होतो आणि मी खूपच एक्सायडेट होतो. सलमान खानसारखा एवढा मोठा स्टार आम्हाला त्याच्या शोमध्ये बोलावतोय ही मोठी गोष्ट होती. आमचा पिक्चर आता सगळीकडे पोहोचेल, असं आम्हाला वाटत होतं. नंतर आममही स्टेजवरून खाली उतरलो आणि बोलत होतो. तेव्हाच सलमान खानने अगदी मोकळेपणाने, स्पष्ट शब्दांत सांगितलं की, तुझा हा पिक्चर चालणार नाहीये. जाऊन टीव्ही (काम) किंवा इतर काही कर. पैसे मिळवं, सर्व्हाईव कर, तुझं घरं बनव- असं सलमानने सांगितल्याचं अक्षयने नमूद केलं.
चित्रपटाची किती होती कमाई ?
पुढे अक्षय म्हणाला, त्यांनी (सलमान) दिलेला सल्ला अगदी योग्य होता, पण तेव्हा मला काही समजत नव्हतं. पण त्याचं बोलणं योग्य होतं. आणि अनुभवातून हेच शिकतो आपण. माझा तो चित्रपट चालला नाही, फ्लॉप झाला. आणि त्या चित्रपटानंतरच माझा संघर्ष सुरू झाला., असं त्याने सांगितलं. बॉक्स ऑफिस इंडियानुसार, ‘इसी लाइफ में’ या चित्रपटाचं बजेट होतं 8.5 कोटी रुपये आणि चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर फक्त 1.39 कोटी रुपयांची कमाई केली.
शाहरुखच्या चित्रपटात झळकणार अक्षय
अक्षय ओबेरॉयने आत्तापर्यंत ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’, ‘पीकू’, ‘फितूर’ आणि ‘फायटर’ सारख्या चित्रपटांत काम केलं आहे. आता तो बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याच्यासोबत ‘किंग’ चित्रपटात झळकणार आहे. याच दिग्दर्शन फायटर चित्रपटाच्याच सिद्धार्थ आनंदने केलं आहे. ‘किंग’ मध्ये अक्षय ओबेरॉय छोट्याशा भूमिकेत दिसणार असला तरी एवढ्या मोठ्या चित्रपटाचा भाग व्हायती संधि मिळणं हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे, असं त्याचं मत आहे. यावर्षी 24 डिसेंबरला ‘किंग’ हा चित्रपट मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे.