Dhurandhar : अक्षय खन्ना खायला लागलाय भाव… दिग्दर्शकासोबत मतभेद… केलीये मोठी मागणी?

Dhurandhar : 'छावा', 'धुरंधर' नंतर वाढलाय अक्षय खन्नाचा भाव... मोठ्या मागणीनंतर दिग्दर्शकासोबत मतभेद? मोठी माहिती समोर... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अक्षय याची चर्चा...

Dhurandhar : अक्षय खन्ना खायला लागलाय भाव... दिग्दर्शकासोबत मतभेद... केलीये मोठी मागणी?
अभिनेता अक्षय खन्ना
| Updated on: Dec 24, 2025 | 11:22 AM

Dhurandhar : ‘धुरंधर’ सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहेत. फक्त भारतात नाही तर, परदेशात देखील ‘धुरंधर’ सिनेमा विक्रम रचत आहे.. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘धुरंधर’ सिनेमाची चर्चा रंगत आहे. अभिनेता रणवीर सिंग, संजय दत्त, आर माधवन यांच्यासोबत अभिनेता अक्षय खन्ना याने महत्त्वाची भूमिका साकारली. अक्षय याने सिनेमात रेहमान डकैत याची भूमिका साकारली. अक्षय याने साकारलेल्या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर देखील घेतलं. सोशल मीडियावर अक्षय याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.

‘धुरंधर’ सिनेमाच्या यशाचा आनंद साजरा करत असताना अक्षय याचं नाव ‘दृश्यम 3’ सिनेमाशी देखील जोडलं जात आहे. असं म्हटलं जात आहे की, निर्मात्यांशी असलेल्या सर्जनशील मतभेदांमुळे आणि आर्थिक मतभेदांमुळे अभिनेत्याने या सिनेमातून माघार घेतली आहे.

रिपोर्टमध्ये केलेल्या दाव्यानुसार, ‘छावा’ आणि ‘धुरंधर’ सिनेमान साकारलेल्या दमदार भूमिकेनंतर अक्षय खन्ना याने स्वतःच्या मानधनात मोठी वाढ केला आहे… एवढंच नाही तर, ‘दृश्यम 3’ सिनेमात लूक वेगळ्या पद्धतीने दाखवण्याची देखील अभिनेत्याने मागणी केली आहे… असं सांगण्यात येत आहे की, याच मुद्द्यामुळे वाद सुरु आहेत. याच कारणामुळे अक्षय याने ‘दृश्यम 3’ सिनेमातून स्वतःला वेगळं ठेवलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय खन्ना आणि निर्मात्यांमध्ये अजूनही चर्चा सुरू आहे. त्याच्या बाहेर पडण्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अभिनेता या सिनेमा दिसेल की, निर्माते त्याची जागी दुसऱ्या अभिनेत्याला घेतील हे सध्या अनिश्चित आहे.

‘धुरंधर’ हा अक्षय खन्नाच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा सिनेमा आहे. यात रणवीर सिंग, सारा अर्जुन, आर माधवन आणि संजय दत्त यांच्याही भूमिका आहेत. रिलीज झाल्यानंतर तीन आठवड्यांनंतरही, सिनेमा अजूनही आपला ठसा उमटवत आहे. 17 दिवसांत भारतात त्याने 555 कोटी आणि जगभरात ८.४७ कोटी रुपयांची कमाई केली. आहे.

‘धुरंधर 2’ कधी प्रदर्शित होणार?

पहिल्या भागाच्या शेवटी त्याच्या सिक्वेलची घोषणा करण्यात आली. ‘धुरंधर 2’ 19 मार्च 2026 रोजी प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे.पण याबद्दल कोणतीच अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.