Akshaye Khanna : 10-20 कोटी नव्हे, अक्षय खन्नाने ‘दृश्यम 3’साठी मागितली इतकी फी ! का फिस्कटली बोलणी ?

Akshaye Khanna Fees Drishyam 3 : ‘धुरंधर’चा सगळीकडे बोलबाला असून अक्षय खन्नाचंही प्रचंड कौतुक होतंय. त्याच्या पुढल्या चित्रपटाची लोकांना खूप उत्सुकता असून तो दृश्यम 3 मध्ये दिसणार असल्याची चर्चा होती. मात्र अचानक त्याने हा चित्रपट सोडल्याचे बोलले जाऊ लागलं. काय होती अक्षयची मागणी ?

Akshaye Khanna : 10-20 कोटी नव्हे, अक्षय खन्नाने  ‘दृश्यम 3’साठी मागितली इतकी फी ! का फिस्कटली बोलणी ?
Akshaye Khanna
| Updated on: Dec 26, 2025 | 1:27 PM

Akshaye Khanna Fees Drishyam 3: रणवीर सिंहचा ‘धुरंधर’ रिलीज होऊन आज 22 दिवस झालेत. अवघ्या 3 आठवड्यात या चित्रपटाने तूफान कामगिरी केली आहे, मोठ-मोठे रेकॉर्ड्स तोडलेत. दर दिवशी या चित्रपटाची कमाई वाढतच चालली असून पिक्चरला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. मात्र याचं श्रेय प्रमुख भूमिकेतील रणवीर सिंग पेक्षा अक्षय खन्नाला (Akshaye Khanna) दिलं जात आहे. कारण रहमानचा डकैतच्या भूमिकेत त्याचा लूक, अभिनय, नृत्य आणि स्टाईल व्हायरल होताच, लोक त्याला पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी करू लागले. या चित्रपटाने भारतात 600 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. हा चित्रपट लवकरच जगभरात 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करणार हे नक्की.

दरम्यान अक्षयच्या पुढल्या चित्रपटाची लोकांना खूप उत्सुकता असून तो पुढच्या वर्षीच अजय देवगणच्या दृश्यम ३ मध्ये दिसणार होता. पण त्याने हा प्रोजेक्ट सोडल्याची चर्चा असून फी वाढीमुळे हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

अक्षय खन्ना यापूर्वी २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या दृश्यम 2 मध्येही दिसला होता. या चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. रिपोर्ट्सनुसार, अक्षयला या चित्रपटासाठी 2.5 कोटी रुपये मानधन मिळाले. तर अजय देवगणला 30 कोटी मिळाले. आता, अक्षय खन्नाची फी 20 कोटींपेक्षा जास्त असल्याचे वृत्त आहे, ज्यामुळे निर्मात्यांचे संपूर्ण बजेट हादरले आहे. मात्र अक्षयला त्याची डिमांड योग्य वाटते आहे. एवढंच नव्हे तर त्याला त्याच्या लूकमध्येही बदल हवेत, अशी मागणी त्याने केली असल्याचे वृत्त आहे. जाणून घेऊया सविस्तर माहिती..

अक्षय खन्ना किती मागतोय फी ?

अजय देवगणचा “दृश्यम 3” हा चित्रपट पुढील वर्षी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 2 ऑक्टोबर 2026 रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची जोरदार तयारी सुरू आहे. यावेळी या चित्रपटात अजय देवगण, तब्बू, श्रिया सरन आणि रजत कपूर यांच्या भूमिका असतील. दुसऱ्या भागात दिसलेल्या अक्षय खन्नाचे नाव चित्रपटाच्या तिसऱ्या भागातून गायब झालेले पाहून लोक प्रश्न विचारू लागले. धुरंधरमध्ये प्रभावी अभिनय असूनही अक्षय खन्नाला का कास्ट करण्यात आले नाही? असा सवाल ज्याच्या त्याच्या तोंडी आहे. पण फीवरून झालेल्या मतभेदांमुळे अक्षयने या चित्रपटाच्या तिसऱ्या भागातून माघार घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. अक्षयने त्याची फी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘दृश्यम 3’ साठी त्याने फी वाढवली असून तो 21 कोटी इतकी रक्कम मागतो आहे,

खरं तर, २०२५ मध्ये, अक्षयने पहिल्यांदा ‘छावा’ मध्ये औरंगजेबच्या भूमिकेत प्रेक्षकांना भुरळ घातली. आता, त्याने ‘धुरंधर’ मध्ये रेहमान डकैतची भूमिका उत्तमपणे बजावली आहे. त्यामुळे अक्षय खन्ना असं मानतो की फी वाढवण्याची त्याची मागणी योग्य आहे, कारण सध्या सगळीकडे त्याच्याच नावाची चर्चा आहे. पण अक्षयच्या या मागणीने “दृश्यम 3” चे निर्माते हैराण झाले आहेत. त्यांनी अक्षयला समजावण्याचा प्रयत्न केला आहे. कारण जर त्याची फी वाढली तर बजेटही तितकंच वाढेल.

मोठ्या बदलाची अक्षयची मागणी

एवढंच नव्हे तर अक्षय खन्ना आणि निर्मात्यांमध्ये इतर काही मुद्द्यांवरही मतभेद होते अशी माहितीदेखील रिपोर्ट्समधून समोर आली आहे. दृश्यम 3 मध्ये विग घालण्याचा सल्ला अक्षयनेदिला होता. पण, निर्मात्यांना ही कल्पना आवडली नाही, कारण तो दुसऱ्या भागात विगशिवाय दिसला होता. पण मागण्या पूर्ण न झाल्यामुळे अक्षयने चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि निर्मात्यांना शुभेच्छा दिल्या. भविष्यात त्यांच्यासोबत अ7य काम करू शकतो, पण ते कधी याचीच सर्वांना उत्सुकता आहे.