OTT Trending : 40 भूतांची रहस्यमय दुनिया, 28 दिवसांपासून दुसऱ्या क्रमांकावर; जिओ हॉटस्टारवरील सीरिज पाहिलीत का?

ओ हॉटस्टारवरील एक हॉरर-कॉमेडी मिस्ट्री सीरिज गेल्या 28 दिवसांपासून टॉप 10 ट्रेंडिंग लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. आशा नेगी आणि विशाल वशिष्ठ यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सीरिजमध्ये 40 भूतांच्या रंजक आणि थरारक कथा पाहायला मिळतात.

OTT Trending : 40 भूतांची रहस्यमय दुनिया, 28 दिवसांपासून दुसऱ्या क्रमांकावर; जिओ हॉटस्टारवरील सीरिज पाहिलीत का?
कोणती आहे ही सीरिज
Image Credit source: social media
| Updated on: Oct 12, 2026 | 2:35 AM

सध्या जिओ हॉटस्टारवर दररोज नवनवीन चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होत आहेत, ज्यामध्ये हॉररपासून ते थ्रिलरपर्यंत अनेक विषयांचा समावेश आहे. पण आज आपण एका अशा सीरिजबद्दल बोलणार आहोत, जी गेल्या २८ दिवसांपासून टॉप १० ट्रेंडिंग लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर ठाण मांडून बसली आहे. या सीरिजचे आतापर्यंत २० एपिसोड्स आले असून दर शुक्रवारी एक नवीन एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला येतो. या शोने ‘बिग बॉस’ला मागे टाकलं नसलं तरी, ‘खतरों के खिलाडी’, ‘लाफ्टर शेफ्स अनलिमिटेड एंटरटेनमेंट’ आणि ‘बेथलम कुटुंब युनिट’ यांसारख्या लोकप्रिय शोज आणि चित्रपटांना मात्र जोरदार टक्कर देत मागे टाकलं आहे.

२८ दिवसांपासून ट्रेंडिंगमध्ये असलेली सीरिज

आपण ज्या सीरिजबद्दल बोलत आहोत, तिचं नाव आहे ‘अली बाबा और ४० भूत’. ४० एपिसोड्सच्या या सीरिजचा प्रीमियर ११ सप्टेंबर रोजी जिओ हॉटस्टारवर झाला होता. भुवनेश श्रीवास्तव यांनी या सीरिजची निर्मिती केली आहे. यामध्ये आशा नेगी, विशाल वशिष्ठ, रमनदीप यादव आणि मानसी सहगल हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. ही एक अतिशय रंजक अशी हॉरर-कॉमेडी मिस्ट्री सीरिज आहे.

Loading...

४० भूतांना पकडणारी हंटर

‘अली बाबा और ४० भूत’ या वेब सीरिजमध्ये आशा नेगीने ‘अलिशा निगम’ नावाच्या एका ‘घोस्ट हंटर’ची (भूत पकडणारी) वेगळ्या धाटणीची भूमिका साकारली आहे. ती आपल्या बेपत्ता झालेल्या पुरातत्वशास्त्रज्ञ वडिलांचा शोध घेण्यासाठी आपल्या गावी परतते. तिच्यासोबत विशाल वशिष्ठ (बाबाराव उपाध्याय) आणि रमनदीप यादव (किन्नू) हे देखील मुख्य भूमिकेत दिसत आहेत. एकूण ४० एपिसोड्सच्या या सीरिजमध्ये वेगवेगळ्या भूतांच्या रंजक आणि थरारक कथा दाखवण्यात आल्या आहेत.

आशा नेगीबद्दल थोडंसं…

आशा नेगी हे टेलिव्हिजन विश्वातील एक अत्यंत ओळखीचं आणि लोकप्रिय नाव आहे. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून ‘पूर्वी’ची भूमिका साकारून तिने घराघरात ओळख मिळवली होती. मात्र, तिच्या मालिकांपेक्षा अभिनेता ऋत्विक धनजानीसोबतचं तिचं नातं जास्त चर्चेत राहिलं. जेव्हा या दोघांचं ब्रेकअप झालं, तेव्हा टीव्ही इंडस्ट्री आणि त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. असं असलं तरी, आज ते दोघेही चांगले मित्र आहेत. नुकतेच ते अभिनेत्री सुरभी ज्योतीच्या लग्नात एकत्र सहभागी झाले होते आणि तिथे त्यांनी खूप धमालही केली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us