आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांना मोठा धक्का, इंडस्ट्रीमधून मोठी अपडेट समोर

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे नेहमीच चर्चेत असतात. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या जोडीला चाहत्यांचे मोठे प्रेम मिळते. 14 एप्रिलला आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी लग्न करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. आलिया हिने 6 नोव्हेंबरला एका गोंडस मुलीला जन्म दिला.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांना मोठा धक्का, इंडस्ट्रीमधून मोठी अपडेट समोर
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 13, 2023 | 6:43 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच रणबीर कपूर याचा तू झुठी में मक्कार हा चित्रपट रिलीज झाला होता. विशेष म्हणजे या चित्रपटाने धमाकेदार कमाई देखील बाॅक्स आॅफिसवर केलीये. आता एका नव्या चित्रपटामुळे (Movie) रणबीर कपूर हा चर्चेत आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट एका चित्रपटामध्ये धमाका करताना दिसणार असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटामध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचे नाव आल्यापासून त्यांचे चाहते आनंदी झाल्याचे बघायला मिळत आहेत. मात्र, आता त्याच चित्रपटासंदर्भात मोठी बातमी पुढे येतंय.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे रामायण चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. रणबीर कपूर हा रामाच्या तर आलिया भट्ट ही माता सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र, अनेकांनी जाहिरपणे यावर नाराजी व्यक्त केलीये. या चित्रपटात फक्त आलिया आणि रणबीरच नाही तर अजून एका मोठ्या स्टारचे नाव चर्चेत होते.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्यासोबतच साऊथ स्टार यश हा देखील चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत असणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता या संदर्भात अत्यंत मोठी अपडेट ही पुढे येत आहे. या चित्रपटात यश हा रावणाच्या भूमिकेत असणार असल्याची चर्चा होती. चित्रपट निर्मात्यांनी यश याच्यासोबत संपर्क देखील केला होता.

यश याने ही भूमिका करण्यास नकार दिला आहे. यामुळे रामायण चित्रपटाच्या निर्मात्यांना यश ऐवजी आता नवा चेहरा हा शोधावा लागणार आहे. यश याने रावणाचे पात्र साकारण्यास नकार दिला आहे. कंगना राणावत हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत रणबीर कपूर हा रामच्या भूमिकेत दिसणार असल्याने संताप व्यक्त केला.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे रामायण चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे कळताच बाॅलिवूड कंगना राणावत हिने समाचार घेतला होता. कंगना राणावत हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत भडास काढली होती. कंगना राणावत हिच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करताना दिसले. नेपोटिझमुळेही अनेकांनी आलिया आणि रणबीर यांनी टार्गेट केले. आता रामायण हा चित्रपट प्रचंड चर्चेत असलेले बघायला मिळत आहे. या चित्रपटांची यंदाच शूटिंग करण्यात येणार आहे.