AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“हो मी पॅरालायज्ड झालेय? आता जगू द्या आम्हाला”; आलियाचा संताप, मनातील सगळा राग काढला

आलिया भटने एक लांबलचक पोस्ट लिहून तिच्या मनातील राग व्यक्त केला. तिच्या चेहऱ्यावरील हावभावांवरून तिला बरंच काही बोललं जात असल्याने तिने अखेर संतापाने सर्वांनाच सुनावलं आहे.

हो मी पॅरालायज्ड झालेय? आता जगू द्या आम्हाला; आलियाचा संताप, मनातील सगळा राग काढला
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Dec 29, 2024 | 7:54 PM
Share

आलिया भट नेहमी तिच्या लूक, ड्रेसिंगवरून किंवा तिच्या ब्युटी टीप्सच्या व्हिडीओमुळे चर्चेत असते. मात्र काही दिवसांपासून सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटशी संबंधित काही व्हिडीओ आणि काही लेख व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये आलियाच्या चेहऱ्यासह तिच्या शरीरासंदर्भात वेगवेगळ्या कमेंटस् केल्या जात आहेत.

सर्जरी आणि बोटॉक्सवरून ट्रोल

तसेच तिला सर्जरी आणि बोटॉक्सवरून ट्रोल करण्यात आलं आहे. आलियाने बोटॉक्स केले आहे. पण तिची ट्रीटमेंट चुकीचे झाल्याने चेहरा बिघडला असल्याचं काहींनी म्हटलं, तर काहींनी आलियाच्या चेहऱ्याच्या एका बाजूला लकवा मारला आहे का? अशा कमेंट केल्या आहेत.

या कमेंटमुळे आणि अशा पद्धतीच्या व्हिडीओमुळे आलियाने वैतागून सर्वांना चांगलंच सुनावलं होतं. अखेर आलियाने या सर्व ट्रोलर्संना उत्तर दिले होतं. इन्स्टाग्रामवर तिने एक लांबलचक स्टोरी पोस्ट करत आपला राग, संताप व्यक्त करत ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं होतं. आलियाची ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली होती. आजही त्या पोस्टबद्दल तेवढीच चर्चा होते. आलियाने नेमके काय म्हटलं होतं ते पाहुया….

“माझी बोलण्याची पद्धत विचित्र…”

“जे लोक आपल्या शरीरासाठी कॉस्मेटिक करेक्शन किंवा एखाद्या सर्जरीची निवड करतात, त्या लोकांप्रति माझे कोणतेही जजमेंट नाही. शरीर तुमचे आहे तर निर्णय देखील तुमचाच असला पाहिजे. पण वाह! हे तर हास्यास्पद गोष्टीपलिकडील आहे. काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये असा दावा करण्यात येत आहे की, मी बोटॉक्स केले पण त्याचे चुकीचे परिणाम झाले. (काही क्लिकबेट लेखही चालवले जाताहेत). ज्यामध्ये तुमच्यानुसार असे म्हटले गेलेय की माझे हसणे व्यवस्थित नाही, माझी बोलण्याची पद्धत विचित्र आहे. हे म्हणजे चेहऱ्यावरील बारीकसारीक दोष शोधून काढण्यासारखे आहे. कोणत्याही पुराव्याशिवायच हा अतिशय गंभीर दावा करण्यात आला आहे”. असं म्हणत तिने राग व्यक्त केला होता.

हे सगळं कशासाठी करताय? आलियाचा सवाल

आलिया पुढे म्हणाली, “सर्वात वाईट बाब म्हणजे तुम्ही तरुणांनाही भरकटवत आहात, पण जे तुम्ही केलेले दावे खरे मानत आहेत. का करताय तुम्ही असे? केवळ लक्ष वेधून घेण्यासाठी? कारण याने काहीही अर्थ साध्य होत नाही. यासारख्या वायफळ गोष्टींवरुन महिलांप्रति मत तयार केले जाते आणि आमचा चेहरा, शरीर, खासगी आयुष्य इतकंच काय तर आमच्या पार्श्वभागावरून आमच्यावर टीका केली जाते. मायक्रोस्कोपद्वारे निरीक्षण करण्याऐवजी प्रत्येकाचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आपण स्वीकारले पाहिजे”. असा सवाल आलियाने विचारला  होता.

‘जगा आणि जगू द्या…’

शेवटी आलियाने पुढे असे लिहिलंय की, “अतिशय दुःखाची बाब म्हणजे महिलेसाठी एका महिलेकडूनच या सर्व गोष्टी म्हटल्या जात आहेत. ‘जगा आणि जगू द्या’ या धोरणाचे काय झालं? कोणाला स्वतःच्या हिशेबाने जगण्याचा हक्क नाहीय का? आपल्याला एकमेकांचा अपमान करण्याची इतकी सवय लागली आहे की या सर्व गोष्टी अगदी सामान्य वाटतात.” अशी लांब-लचक पोस्ट करत आलियाने संताप व्यक्त केला होता.

काही दिवसांपासून आलिया भटच्या चेहऱ्याच्या हावभावांशी संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले जात असून तिच्या गालावरील खळीपासून ते तिच्या बोलण्याच्या पद्धतीवर नेटकरी कमेंट आणि चर्चा करताना दिसत असल्याचे पाहून आणि ते जास्त प्रमाणात होत असल्याचे पाहून आलियाने संताप व्यक्त केला होता.

Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट