Alia Bhatt | आलियाच्या ‘या’ गोष्टीला रणबीरचा साफ नकार; खुलासा करताच अभिनेत्याला केलं ट्रोल

'भारतातील सर्वांत प्रसिद्ध अभिनेत्री हे सांगतेय यावर माझा विश्वास बसत नाहीये', असं एका युजरने लिहिलं आहे. तर काहींनी रणबीरची तुलना थेट 'कबीर सिंग' या व्यक्तीरेखेशी केली. केवळ पतीला आवडत नाही म्हणून ती लिपस्टिक पुसून टाकते, हे योग्य नाही, असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. 

Alia Bhatt | आलियाच्या या गोष्टीला रणबीरचा साफ नकार; खुलासा करताच अभिनेत्याला केलं ट्रोल
आलिया भट्ट-रणबीर कपूर
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 16, 2023 | 6:06 PM

मुंबई | 16 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या बॉलिवूड आणि ‘हार्ट ऑफ स्टोन’ या हॉलिवूड चित्रपटामुळे चर्चेत आहे. आलिया सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असून तिच्या चाहत्यांसोबत नेहमीच विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. सेलिब्रिटी त्यांचा मेकअप कसा करतात आणि त्यासाठी कोणती सौंदर्यप्रसाधनं वापरतात, हे जाणून घेण्याची चाहत्यांना फार उत्सुकता आहे. किंबहुना मेकअप ट्युटोरियलचा व्हिडीओ पोस्ट करणं हा सेलिब्रिटींसाठीही नवा ट्रेंड बनला आहे. याच ट्रेंडचा विचार करत आलियानेही नुकताच तिच्या मेकअपचा एक व्हिडीओ पोस्ट केला. मात्र या व्हिडीओतील एका गोष्टीमुळे तिचा पती रणबीर कपूरला खूप ट्रोल केलं जातंय.

या व्हिडीओमध्ये आलिया तिचा मेकअप रुटीन सांगताना दिसत आहे. कोणत्याही कार्यक्रमासाठी, शूटसाठी किंवा डिनर डेटसाठी जाताना ती कसा मेकअप करते, हे तिने व्हिडीओमार्फत दाखवलं आहे. या व्हिडीओच्या अखेरीस ती तिच्या लिपस्टिक लावण्याच्या अनोख्या पद्धतीविषयी सांगते. सर्वसामान्य मुली लिपस्टिक कशा पद्धतीने लावतात आणि ती कशा पद्धतीने लावते, यातला फरक तिने सांगितला. यावेळी तिने हेसुद्धा सांगितलं की ती लिपस्टिक लावून ते पुसून टाकते. कारण रणबीरला तिने लिपस्टिक लावलेलं आवडत नाही. त्याला माझ्या ओठांचा नैसर्गिक रंगच आवडतो, असं आलिया म्हणते. यावरूनच नेटकऱ्यांनी रणबीरला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

रणबीर हा आलियावर फार नियंत्रण मिळवू पाहतो, असे कमेंट्स नेटकऱ्यांनी केले आहेत. ‘रणबीरबद्दल मी आलियाकडून जितकं ऐकतेय, तितकी मला तिच्यासाठी भीती वाटतेय. जर तुमचा बॉयफ्रेंड किंवा पती तुम्हाला लिपस्टिक पुसायला सांगत असेल तर तुम्ही अशा व्यक्तीपासून लांबच राहिलं पाहिजे. भारतातील सर्वांत प्रसिद्ध अभिनेत्री हे सांगतेय यावर माझा विश्वास बसत नाहीये’, असं एका युजरने लिहिलं आहे. तर काहींनी रणबीरची तुलना थेट ‘कबीर सिंग’ या व्यक्तीरेखेशी केली. केवळ पतीला आवडत नाही म्हणून ती लिपस्टिक पुसून टाकते, हे योग्य नाही, असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.