Alia Bhatt | ‘कामासोबत आईची जबाबदारी कशी पार पाडतेस?’ आलिया भट्टच्या उत्तराने जिंकली मनं

आलिया आणि रणबीरने गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात लग्न केलं. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात आलियाने मुलीला जन्म दिला. राहा कपूर सध्या आठ महिन्यांची आहे. आई झाल्यानंतर आयुष्यातील प्राधान्यक्रम कशा पद्धतीने बदलत गेले, याविषयी आलिया विविध मुलाखतींमध्ये मोकळेपणे व्यक्त झाली.

Alia Bhatt | 'कामासोबत आईची जबाबदारी कशी पार पाडतेस?' आलिया भट्टच्या उत्तराने जिंकली मनं
Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 16, 2023 | 5:23 PM

मुंबई | 16 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री आलिया भट्टने नुकतंच हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. ‘हार्ट ऑफ स्टोन’ हा तिचा पहिलावहिला हॉलिवूड चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. यानिमित्ताने तिने इन्स्टाग्रावर चाहत्यांशी संवाद साधला. आलियाने चाहत्यांना विविध प्रश्न विचारण्याची संधी दिली आणि त्यांची उत्तरं तिने ‘आस्क मी एनिथिंग’ सेशनद्वारे दिली आहेत. यावेळी आलियाला तिच्या खासगी आयुष्याविषयीही काही प्रश्न विचारण्यात आले. आईची जबाबदारी आणि काम या दोन्ही गोष्टींमध्ये तू कसा समन्वय साधतेय, असा प्रश्न एका युजरने विचारला. त्यावरही आलियाने विचारपूर्वक उत्तर दिलं आहे.

तू तुझं काम आणि बाळाला कसं सांभाळतेस? एक आई म्हणून माझ्या मनात कधीकधी मनात अपराधीपणाची भावना येते, असा प्रश्न एका युजरने आलियाला विचारला. त्यावर उत्तर देताना तिने लिहिलं, ‘पालकत्व ही आयुष्यभराची जबाबदारी आहे. मला वाटत नाही की त्याच्याशी संबंधित प्रश्नांची सर्व उत्तरं तुमच्याकडे असतील किंवा तुम्ही परफेक्ट पालक बनू शकता. पण माझे सर्व प्रयत्न फक्त यासाठीच असतात की मी प्रत्येक दिवस प्रेम आणि फक्त प्रेमानेच घालवू शकेन. कारण खूप सारं प्रेम अशी कोणतीच गोष्ट नसते.’

हे सुद्धा वाचा

यावेळी आलियाला सोशल मीडियावर किंवा इतर प्लॅटफॉर्मवर पसरवल्या जाणाऱ्या नकारात्मक आणि टीकाटिप्पणींचा सामना कसा करतेस असाही प्रश्न एका युजरने विचारला. त्यावर तिने एक प्रचलित कथा पोस्ट केली. ‘द बॉय, द मोल, द फॉक्स अँड द हॉर्स’ या प्रसिद्ध पुस्तकातील एक ओळ पोस्ट करत तिने सारांश सांगण्याचा प्रयत्न केला. या कथेनुसार चिचुंद्रीसारखा दिसणारा एक प्राणी प्रश्न विचारतो की, ‘तुझा सर्वोत्तम शोध कोणता?’ त्यावर उत्तर देताना मुलगा म्हणतो, ‘मी जसा आहे तसाच पुरेसा आहे.’

‘योग्य विचारपूर्वक केलेली टीका तुमच्या प्रगतीसाठी सर्वोत्तम मार्ग आहे. पण जे शब्द फक्त तुम्हाला दुखावण्यासाठी वापरले जातात, त्यांना तुम्ही संधी दिली तरच ते तुम्हाला दुखावू शकतात. तुम्ही जे आहात, ते कोणीच तुमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. तुम्ही तुमचं आयुष्य इतक्या प्रेमाने आणि कृतज्ञतेने बनवा की बाहेरची नकारात्मका तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही’, असं तिने या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

आलिया आणि रणबीरने गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात लग्न केलं. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात आलियाने मुलीला जन्म दिला. राहा कपूर सध्या आठ महिन्यांची आहे. आई झाल्यानंतर आयुष्यातील प्राधान्यक्रम कशा पद्धतीने बदलत गेले, याविषयी आलिया विविध मुलाखतींमध्ये मोकळेपणे व्यक्त झाली. आलियाने स्पष्ट केलंय की आता ती तिच्या कुटुंबाला आणि मुलीला प्राधान्य देणार आहे. मात्र त्याचसोबत ती फिल्म इंडस्ट्री सोडणार नाही.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.