Elvish Yadav | ‘बिग बॉस ओटीटी 2’मध्ये बहीण पूजा भट्ट हरल्यानंतर एल्विश यादवबद्दल आलियाने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

सिस्टमचा खरा अर्थ एखादी प्रणाली किंवा व्यवस्था असा होतो. मात्र एल्विशच्या 'सिस्टम'चा अर्थ वेगळाच आहे. एल्विशचे लाखो चाहते आणि फॉलोअर्स आहेत, त्यांच्यासाठी 'सिस्टम' हा शब्द वापरला जातो.

Elvish Yadav | बिग बॉस ओटीटी 2मध्ये बहीण पूजा भट्ट हरल्यानंतर एल्विश यादवबद्दल आलियाने दिली ही प्रतिक्रिया
Elvish Yadav and Alia Bhatt
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 16, 2023 | 7:06 PM

मुंबई | 16 ऑगस्ट 2023 : जवळपास आठ आठवड्यांनंतर बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सिझनचा ग्रँड फिनाले 14 ऑगस्ट रोजी पार पडला. प्रसिद्ध युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर एल्विश यादवने बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावे केली. तर ग्रँड फिनालेमध्ये पोहोचलेल्या टॉप 5 स्पर्धकांमध्ये अभिषेक मल्हान, एल्विश यादव, पूजा भट्ट, मनीषा राणी आणि बेबिका धुर्वे यांचा समावेश होता. यंदाचा सिझनचं विजेतेपद पूजा भट्ट पटकावू शकतो, असाही अंदाज काही दिवसांपूर्वी व्यक्त केला गेला. कारण बिग बॉसच्या घरातील सर्वांत दमदार स्पर्धकांमध्ये तिचं नाव घेतलं जात होतं. आता बिग बॉसचा सिझन संपल्यानंतर अभिनेत्री आलिया भट्ट हिने एल्विशसाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

आलियाने इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी एनिथिंग’ या सेशनद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी तिने नेटकऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरं मोकळेपणे दिली. एका युजरने तिला एल्विश यादवबद्दल काहीतरी लिहिण्यास सांगितलं. त्यावर तिने लिहिलं, ‘सिस्टम…’. एल्विशच्या चाहत्यांना हा शब्द फार चांगल्याप्रकारे माहीत असेल. कारण जेव्हा जेव्हा एल्विशचं नाव घेतलं जातं, तेव्हा सिस्टम (Systumm) हा शब्द बोलला जातो. बिग बॉसच्या घरात एल्विशच्या तोंडून अनेकदा हा शब्द ऐकायला मिळाला. मात्र त्याचा नेमका अर्थ काय, असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

सिस्टमचा खरा अर्थ एखादी प्रणाली किंवा व्यवस्था असा होतो. मात्र एल्विशच्या ‘सिस्टम’चा अर्थ वेगळाच आहे. एल्विशचे लाखो चाहते आणि फॉलोअर्स आहेत, त्यांच्यासाठी ‘सिस्टम’ हा शब्द वापरला जातो. याशिवाय त्याचा स्वत: कपड्यांचा एक ब्रँड आहे, त्याचंही नाव त्याने ‘सिस्टम’ क्लोदिंग असं ठेवलं आहे. तेव्हापासूनच हा शब्द ट्रेंडमध्ये आहे.

याआधी आलिया भट्टने तिची बहीण पूजानेच बिग बॉसचा सिझन जिंकावा अशी इच्छा बोलून दाखवली होती. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त एका कार्यक्रमात पोहोचलेल्या आलिया पापाराझींनी पूजा भट्टविषयी काहीतरी बोलण्याची विनंती केली होती. त्यावर ती म्हणाली होती, “वो वहा है, वो ही मेरे लिए जीतें, I love her” (ती तिथे आहे आणि माझ्यासाठी तिनेच जिंकावं. मी तिच्यावर खूप प्रेम करते.)