Zombivali | ‘झोंबिवली’च्या अवलियांचा झक्कास फोटो, चाहते नव्या अपडेटच्या प्रतीक्षेत!

सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आवश्यक ती सर्व काळजी घेऊन अनलॉकमध्ये ‘हॉरर कॉमेडी’ जॉनर असलेल्या ‘झोंबिवली’ या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले.

Zombivali | ‘झोंबिवली’च्या अवलियांचा झक्कास फोटो, चाहते नव्या अपडेटच्या प्रतीक्षेत!
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 12:35 PM

मुंबई : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरात लॉक डाऊन घोषित करण्यात आला होता. तब्बल 8 महिन्यानंतर ‘अन लॉक’ची नांदी झाली आणि हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आवश्यक ती सर्व काळजी घेऊन अनलॉकमध्ये ‘हॉरर कॉमेडी’ जॉनर असलेल्या ‘झोंबिवली’ (Zombivali Film) या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले. अनोखी कथा आणि वेगळ्या विषयांवर आधारित या चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली होती. त्यातच आता या चित्रपटातील त्रिकुटाने अर्थात अभिनेता अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी यांनी एक फोटो पोस्ट करत चाहत्यांची उत्सुकता आणखी ताणली आहे (Amey Wagh, Vaidehi parshurami, lalit Prabhakar share’s Photo from Zombivali Film Set).

‘झोंबिवली’ हा पहिला मराठी हॉरर कॉमेडी चित्रपट असणार आहे. या चित्रपटात चक्क झोंबिज दिसणार आहेत. सुप्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक आदित्य सरपोतदार दिग्दर्शित या चित्रपटात अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि वैदेही परशुरामी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

View this post on Instagram

A post shared by amey wagh (@ameyzone)

(Amey Wagh, Vaidehi parshurami, lalit Prabhakar share’s Photo from Zombivali Film Set)

नियमांच्या चौकटीत चित्रीकरण…

‘लाईट्स, कॅमेरा, अ‍ॅक्शन’ म्हणण्यासाठी राज्य सरकारने मनोरंजनसृष्टीला ग्रीन सिग्नल दिला. पण, अर्थात सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेल्या नियमांच्या चौकटीत राहूनच चित्रीकरणाला परवानगी देण्यात आली होती. सेटवर निवडक लोकांची उपस्थिती, सोशल डिस्टनसिंगचे पालन करणे, मास्कचा वापर करणे हे कठोर नियम पाळत अखेर चित्रीकरण पार पडले आहे.

सध्या जगात काय घडतंय, आपल्या आजूबाजूला कशी परिस्थिती निर्माण झाली आहे, हे आपण सर्वजण पाहतोय आणि अशा परिस्थितीत एखाद्या नव्या गोष्टीची सुरुवात करणं, हे जरा चॅलेंजिंगच होते. परंतु एका नव्या कोऱ्या, हटके मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करुन मराठी चित्रपटसृष्टीने हे चॅलेंज स्विकारलं (Amey Wagh, Vaidehi parshurami, lalit Prabhakar share’s Photo from Zombivali Film Set).

आता मराठीतही अवतरणार ‘झोंबी’

बऱ्याच कालावधीनंतर मराठी चित्रपटात हॉरर-कॉमेडी पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत आपण बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये झोंबिवर आधारित चित्रपट पाहिले आहेत. पण, मराठीत पहिल्यांदाच झोंबिवर आधारित चित्रपट बनतोय. या चित्रपटाचे शिर्षकही इंटरेस्टिंग आहे. डोंबिवलीमधील झोंबिज असे कनेक्शन असल्यामुळे चित्रपटाचे नाव ‘झोंबिवली’ असे ठेवण्यात आले आहे. या चित्रपटात अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि वैदेही परशुरामी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

‘’झोंबिवली’ हा चित्रपट तरुण पिढीला लक्षात ठेवून बनवला आहे. त्याच बरोबर हॉरर आणि कॉमेडी या दोन्ही गोष्टींचं उत्तम समीकरण प्रेक्षकांना या चित्रपटात अनुभवायला मिळणार आहे’, असे निर्माते-दिग्दर्शक आदित्य सरपोतदार म्हणाले.

साईनाथ गणुवाड, सिध्देश पुरकर, महेश अय्यर आणि योगेश जोशी यांनी चित्रपटाची कथा लिहिली असून, एव्ही प्रफुल्ल चंद्रा यांनी संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी पेलली आहे. चित्रपटाचा नवीन विषय, कलाकारांच्या नवीन जोड्या या सगळ्या गोष्टींमुळे चित्रपटाप्रती प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे. डोंबिवलीमध्ये घडणारी ही ‘झोंबिवली’ची कथा काय आहे, याचे उत्तर पुढच्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये प्रेक्षकांना मिळणार आहे.

(Amey Wagh, Vaidehi parshurami, lalit Prabhakar share’s Photo from Zombivali Film Set)

Non Stop LIVE Update
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.