या बॉलिवूड अभिनेत्रीकडे आहेत करोडोंच्या 400 लग्जरी बॅग्ज; किंंमत एवढी की त्या विकून मुंबईत आलिशान घर येईल

अशी एक बॉलिवूड अभिनेत्री आहे जिच्याकडे 400हून अधिक लग्जरी बॅग्ज आहेत. त्या बॅग्जची किंमत एवढी आहे की त्या विकल्या तर त्या पैशात मुंबईत आलिशान पेंटहाऊस खरेदी करता येईल. कोण आहे ही अभिनेत्री जाणून घेऊयात

या बॉलिवूड अभिनेत्रीकडे आहेत करोडोंच्या 400 लग्जरी बॅग्ज; किंंमत एवढी की त्या विकून मुंबईत आलिशान घर येईल
Amisha Patel luxury bag collection
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 19, 2025 | 12:12 AM

सेलिब्रिटींच्या गोष्टी म्हणजे ज्यांची किंमत आपण कल्पनाही करू शकत नाही.त्यातल्या त्यात अभिनेत्रींकडे असणारे बॅग, डिझायनर कपडे, किंवा दागिने या सर्व गोष्टींची किंमत ही लाखो-करोडोंमध्ये असते. अशीच एक अभिनेत्री आहे जिच्याकडे 400 लग्जरी बॅग्ज आहेत. त्यांची किंमत एवढी आहे की तिच्या म्हणण्यानुसार त्या बॅग्ज विकून मुंबईत आलिशान घर किंवा पेंटहाऊस विकत घेता येईल.

ही अभिनेत्री म्हणजे अमिषा पटेल. तिच्या आलिशान आयुष्याची चर्चा बऱ्याच काळापासून सुरू आहे. असे म्हटले जाते की तिच्या पदार्पणाच्या चित्रपटादरम्यान ती मर्सिडीज कारने येत असे. ती हिरे घालत असे. आता जेव्हा फराह खान तिच्या घरी आली तेव्हा तिच्या आलिशान बॅग्ज, बेल्ट, घड्याळे आणि शूजचे कलेक्शन पाहून ती थक्क झाली.

बॅग पाहून फराह खानला धक्का बसला

अमिषाने फराहला तिच्या बॅग्ज दाखवल्या. फराह हे पाहून व्लॉगमध्ये म्हणते, ‘मी कधीही अमिषाला बॅग्ज रिपीट करताना पाहिले नाही.’ यावर अमिषाने सांगितले की तिच्याकडे 300 ते 400 लक्झरी बॅग्ज आहेत. याशिवाय तिच्याकडे क्लच आणि बेल्ट बॅग्ज वेगळ्या आहेत. भारतात मोठे ब्रँड बॅग्ज लाँच करताच बॅग्ज विकत घेण्यासाठी ते तिला फोन करतात.

खास ब्रँडच्या बॅग्ज कलेक्शन

अमिषा पटेलकडे बग्जने भरलेले कपाट आहे. तिच्याकडे असलेल्या ब्रॅंडेड बॅग्जची किंमत 2 ते 3 कोटींपर्यंत असू शकते. अनेक बॅग्ज पाहून फराह म्हणते की तिला देखील अशा बॅग्ज नेहमीच खरेदी करायच्या होत्या पण किमतीमुळे धाडस झाले नाही.


डिझायनर बॅग्ज

अमिषाने सांगितले की कदाचित इंडस्ट्रीत तिच्यापेक्षा जास्त डिझायनर बॅग्ज कोणाकडेही नसतील. जर तिने या बॅग खरेदी केल्या नसत्या तर ती त्या पैशांनी मुंबईत दुसरे पेंटहाऊस खरेदी करू शकली असती.

अमिषाच्या मर्यादित एडीशनच्या बॅग्ज

अमिषाने सांगितले की तिच्या बहुतेक बॅगा मर्यादित एडीशनच्या आहेत. ज्या कोणाकडेही नाहीत. अमिषाने फराह खानला एक बॅग दाखवली जी तिने हलक्या गुलाबी रंगाची खरेदी केली होती आणि तिचा रंग हळूहळू गडद होत चालला आहे. अमिषाने सांगितले की ती मगरीच्या कातडीपासून बनलेली आहे.

अमिषा चित्रपटांमध्ये सक्रिय नसली तरी देखली ती सोशल मीडियावर सक्रिय असते. तसेच आजही ती सिंगल लाईफ जगत आहे.