जया बच्चन झोल्यानंतर अमिताभ आणि अभिषेक गुपचूप करतात ‘ही’ गोष्ट, ऐकून तुम्ही म्हणाल…

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन हे जया बच्चन झोपल्यानंतर दोघे गुपचूप करतात ही गोष्ट. घरातील कोणत्या व्यक्तीला माहिती नाही.

जया बच्चन झोल्यानंतर अमिताभ आणि अभिषेक गुपचूप करतात ही गोष्ट, ऐकून तुम्ही म्हणाल...
Image Credit source: Social media
| Updated on: Aug 17, 2026 | 6:53 PM

गेल्या अनेक वर्षांपासून ‘कौन बनेगा करोडपती’हा शो मोठ्या प्रमाणात लोक बघताना दिसत आहेत. अशातच ‘कौन बनेगा करोडपती’च्या 18व्या पर्वातून महानायक अमिताभ बच्चन पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. या शोमध्ये बिग बी अनेकदा आपल्या खासगी आयुष्याशी संबंधित किस्से देखील चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतात. नुकताच त्यांनी मुलगा अभिषेक बच्चनसोबत मॅच पाहण्याचा एक मजेदार किस्सा सांगितला.

‘कौन बनेगा करोडपती 18’च्या एका भागात अमिताभ बच्चन यांनी सांगितलं की, त्यांना आणि अभिषेकला क्रिकेट पाहण्याची प्रचंड आवड आहे. दोघेही अनेकदा रात्री उशिरापर्यंत मॅच पाहत बसतात. मात्र त्यांच्या या सवयीमुळे घरातील इतरांची झोपमोड होऊ नये, याचीही ते काळजी घेतात.

घरात क्रिकेटसाठी वेगळा टीव्ही

याबाबत बोलताना अमिताभ बच्चन यांनी सांगितलं की, त्यांनी घरात एक वेगळा टीव्ही लावला आहे. रात्री उशीर झाल्यानंतर जया बच्चन यांना झोपायला सांगून ते आणि अभिषेक मॅच पाहत बसतात. मॅचचा आवाज घरात पसरू नये यासाठी दोघेही हेडफोनचा वापर करतात किंवा टीव्हीचा आवाज अगदी कमी ठेवतात.

मात्र मॅचमध्ये त्यांच्या आवडत्या टीमचा विजय झाला की ही सगळी खबरदारी काही वेळासाठी विसरली जाते. टीम जिंकल्यानंतर उत्साहाच्या भरात अमिताभ आणि अभिषेक दोघेही मोठ्याने ओरडतात. त्यांचा आवाज ऐकून घरातील इतर सदस्यांची झोपमोड होते आणि घरात काहीतरी गंभीर घडलं आहे का अशी त्यांना चिंता वाटते.

सामना जिंकल्यानंतर कसे असते वातावरण?

यानंतर बिग बी आणि अभिषेक यांना घरच्यांना समजावून सांगावं लागतं की, ‘काही झालेलं नाही, आपल्या टीमने गोल केला किंवा चौकार-षटकार मारला!’ अमिताभ बच्चन यांनी हा किस्सा सांगताना स्वतःही हसत या प्रसंगाची मजा घेतली.

अमिताभ बच्चन आणि अभिषेक यांच्यातील हे क्रिकेट प्रेम याआधीही अनेकदा पाहायला मिळालं आहे. मात्र वडील-मुलाचा हा मजेदार किस्सा ऐकून ‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचावर उपस्थित प्रेक्षकांनाही हसू आवरता आलं नाही. या किस्स्यामुळे बच्चन कुटुंबातील साध्या आणि मजेशीर क्षणांची झलक पुन्हा एकदा चाहत्यांना पाहायला मिळाली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us