AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोविंदाचे वाईट दिवस? थायलंडच्या क्लबमधला डान्सचा व्हिडिओ व्हायरल, लोक म्हणाले 51 हजारांसाठी…

काही दिवसांपूर्वी गोविंदाला एका अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार हिच्यासोबत एअरपोर्टवर स्पॉट केले गेले होते.त्यानंतर गोविंदा याचे अफेअर सुरु असल्याची चर्चा सुरु झाली. त्यानंतर त्याची पत्नी सुनीता हीने त्याच्यावर टीका केली होती.

गोविंदाचे वाईट दिवस? थायलंडच्या क्लबमधला डान्सचा व्हिडिओ व्हायरल, लोक म्हणाले 51 हजारांसाठी...
Govinda dancing at a club
| Updated on: Aug 17, 2026 | 8:36 PM
Share

Govinda Seen Performing At Club In Pattaya: अभिनेता गोंविदा सध्या चर्चेत आहे. त्याचे पत्नी सुनिता हिच्याशी सुरु असलेले वाद आणि त्याची गर्लफ्रेंड राणी स्वर्णकार हिच्या सोबत गोविंदा एका चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे. मात्र त्याची पत्नी सुनिता हीने गोविंदावर वयाचा विचार करुन तरी गर्लफ्रेंडबरोबर फिरायचे अशी झोंबरी टीका केल्याने दोघा पती-पत्नीत सोशल मीडियावर तु-तू में में झाल्याने हे जोडपे चर्चेत आहे. त्यात गोविंदा याचा थायलंड येथील क्लबमध्ये परफॉर्म करण्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामुळे चाहत्यांनी गोविंदावर कमेंट केल्या आहेत.

गोंविदा आणि त्याची पत्नी सुनीता अलिकडे एकमेकांवर सोशल मीडियावर येथेच्छ तोंड सुख घेत आहेत. या वादात अभिनेता गोंविदा हा थायलंडच्या पटायात एका क्लबमध्ये डान्स परफॉर्म करताना दिसत आहे.या व्हिडीओ पाहून चाहत्यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

गोविंदा याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात थायलंडच्या पटायात एका क्लबमध्ये डान्स परफॉर्मन्स करताना गोंविदा दिसत आहे. या क्लबमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त अभिनेता गोंविदाचा एक बॅकग्राऊंड डान्सर सोबत आपल्या प्रसिद्ध गाण्यासाठी परफॉर्मन्स करताना दिसला आहे. या डान्स व्हिडीओला सोशल मीडियावर पाहून चाहत्यांनी कमेंट केली आहे. चाहते काय म्हणतात ते पाहूयात..

चाहते काय म्हणाले ?

एका युजरने गोंविदा याच्या व्हायरल व्हिडीओने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले आहे की, या सुपरस्टारसाठी वाईट वाटत आहे, जो क्लबमध्ये परफॉर्मन्स करत आहे.  एका अन्य चाहत्याने लिहिलेय की काम कोणतेही छोटे नसते. तो आधीही बेस्ट होता आणि आता ही बेस्टच आहे. तो मजबूत खंबीर आहे. वाईट काळात कुटुंबाची साथ नसतानाही ठाम आहे. देवाची त्याच्यावर कृपा कायम रहावी.

अन्य एका चाहत्याने लिहिलंय की कमीत कमी गोविंदा कोणाच्या लग्नात तर नाचत नाही ना ? तर एका चाहत्याने दु:खी होत लिहिलेय की काय दिवस आलेत..यार 51 हजारासाठी…

आणखी एका चाहत्याने गोविंदाच्या या परफॉर्मेंसला योग्य म्हटले आहे. त्याने कमेट केली की, ‘पान मसालाच्या जाहिरातीपेक्षा तरी चांगले आहे. ’

गोंविदा आणि सुनीता बेबनाव का ?

काही दिवसांपूर्वी गोविंदाला एका अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार हिच्यासोबत एअरपोर्टवर स्पॉट केले गेले होते ,त्यानंतर गोविंदा याच्या अफेयरची चर्चा होऊ लागली. त्यानंतर सुनीता यांनी देखील पापाराझींना प्रतिक्रीया दिली. सुनीता हीने गोंविदाबद्दल बोलताना फिल्म तयार व्हायला तरी व्हायला हवी प्रमोशनसाठी. हे चित्रपट झाल्यानंतर असते. हे विना चित्रपटच प्रमोशन करत आहेत. काय म्हणायचे. मुलीच्या वयाच्या मुलीसोबत फिरत आहे. लाज वाटायला हवी, काहीतरी स्टँडर्ड असायला हवे.

त्यानंतर सोशल मीडियावर येऊन गोंविदाने पत्नी सुनीतावर टीका केली आणि चुकीच्या भाषेचा वापर केल्याबद्दल खूप टीका केली.

कोणता चित्रपट येतोय ?

गोविंदा त्याच्या आगामी ‘रुपा’ चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. या चित्रपटात कोमल राणी स्वर्णकार ही त्यांची लीड अभिनेत्री आहे. या प्रोजेक्टसाठी गोंविदा प्रमोशन करत आहे. गोविंदा अनेक वर्षांनंतर या सिनेमातून दिसणार आहे.

येथे पाहा व्हिडीओ –

काही दिवसांपूर्वी गोविंदाला एका अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार हिच्यासोबत एअरपोर्टवर स्पॉट केले गेले होते.त्यानंतर गोविंदा याचे अफेअर सुरु असल्याची चर्चा सुरु झाली. त्यानंतर त्याची पत्नी सुनीता हीने त्याच्यावर टीका केली होती.

Follow Us
58 लाख नोंदींच्या प्रमाणपत्रांची मागणी;मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख नोंदींची प्रमाणपत्रे हवीत, वेळ आल्यास सरकार पाडू
भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
बदलापूर वृक्ष प्राधिकरण नियुक्तीवरून भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
देवेंद्र फडणवीसांची धर्मेंद्र प्रधान यांच्याशी भेट; म्हणाले,‘माझे बंधू
फडणवीस-प्रधान भेट: माझे बंधू म्हणत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
बदलापुरात सीलबंद पाण्याच्या नावाखाली दूषित पाण्याची विक्री?
बदलापूरमध्ये सीलबंद पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याची विक्री
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला; कंत्राटदारांवर 12 कोटींचा दंड
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रो स्लॅब कोसळला, आदित्य ठाकरेंची कठोर कारवाईची मागणी
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या'...
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने... फुटीर 6 खासदारांबाबत नवी अपडेट समोर
नवनाथ वाघमारेंचं वादग्रस्त वक्तव्य, नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध, मराठा नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या...
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या बड्या नेत्यासह एकाच मंचवर, त्या व्हिडीओची तुफान चर्चा
सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
Sachin Ahir | सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यादीनाच्या अगदी एका
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यदिनाच्या अगदी एका दिवसापूर्वी... धक्कादायक माहितीचा खुलासा