Amitabh Bachchan: तेल निघालं की नाही? अमिताभ बच्चन यांच्या ट्विटने उडवला गोंधळ! कमेंट्समध्ये विनोदांचा पाऊस
वयाच्या 84 व्या वर्षीही बिग बींचा सोशल मीडियावरील उत्साह कायम आहे. सध्या ते 'कौन बनेगा करोडपती 18' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहेत. त्यांच्या प्रत्येक पोस्टवर चाहत्यांचं लक्ष असतं. आता या तेलाच्या कोड्याचं उत्तर खुद्द बिग बी कधी देणार, याचीच चाहत्यांना प्रतीक्षा आहे.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर आपल्या हटके पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या चित्रपटांइतकीच त्यांच्या सोशल मीडिया पोस्टचीही चाहत्यांमध्ये उत्सुकता असते. आता बिग बी यांच्या एका नव्या ट्विटने नेटकऱ्यांना चांगलंच कोड्यात टाकलं आहे. ‘T 5901 – Tell me, has it come out or not, oil’ असं त्यांनी लिहिलं आहे. विशेष म्हणजे, या पोस्टचा नेमका संदर्भ काय आहे, हे स्पष्ट होत नसल्याने चाहत्यांनीही मजेशीर अंदाज बांधायला सुरुवात केली आहे. अमिताभ बच्चन यांनी याआधीच्या पोस्टमध्ये ‘करना है तो करो, नहीं तेल लेने जाओ’ असं म्हटलं होतं. त्यानंतर आता ‘तेल निघालं की नाही?’ असा प्रश्न विचारल्याने चाहत्यांचा गोंधळ आणखी वाढला आहे. बिग बी यांच्या या दोन पोस्टमधील संबंध काय, असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत. काहींनी तर त्यांच्या या पोस्टमधील शब्दांवरून वेगवेगळे विनोदी अर्थ काढण्यास सुरुवात केली आहे.
बिग बींच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
अमिताभ बच्चन यांच्या पोस्टमध्ये नेमका कोणत्या प्रसंगाचा संदर्भ आहे, हे स्पष्ट झालेलं नाही. त्यांनी कोणाचंही नाव घेतलेलं नाही किंवा या पोस्टमागील कारण सांगितलेलं नाही. त्यामुळे ही एखाद्या व्यक्तीला उद्देशून केलेली टिप्पणी आहे की केवळ शब्दांशी केलेला मजेशीर खेळ, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. बिग बींच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी विनोदांची बरसात केली. काहींनी तेलाचा संदर्भ घेत खाद्यतेल, तर काहींनी गाडीतील इंजिन ऑइलचा उल्लेख करत मजेशीर अंदाज बांधले. नेमकं कोणतं तेल आणि ते कुठून बाहेर येणार, असे प्रश्नही या पोस्टच्या चर्चेतून उपस्थित होत आहेत.
पहा पोस्ट-
अमिताभ बच्चन यांच्या आधीच्या ‘तेल लेने जाओ’ या पोस्टवरही चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यांच्या पोस्टचा संदर्भ कळत नसतानाही कमेंट्समध्ये विनोद करण्याची संधी नेटकऱ्यांनी सोडली नव्हती. दरम्यान, अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावरील पोस्टची एक खास शैली आहे. ते प्रत्येक पोस्टला क्रमांक देतात. ‘T’ या अक्षरानंतर दिला जाणारा क्रमांक ही त्यांची अनेक वर्षांपासूनची ओळख बनली आहे.