
बॉलिवूडचे सुपरस्टार अर्थात अमिताभ बच्चन हे त्यांच्या चित्रपटांसाठी कायमच चर्चेत असतात. त्यांनी आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपट बॉलिवूडला दिली असून मोठा चढउतार त्यांनी बघितला आहे. अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय दिसतात आणि आपल्या चाहत्यांसोबत प्रत्येक अपडेट शेअर करताना दिसतात. अमिताभ बच्चन यांची तिसरी पिढी बॉलिवूडमध्ये धमाका करताना दिसते. अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता नंदा हिचा मुलगा अगस्त्य नंदा याने आपल्या करिअरमधील पहिला बॉलिवूड चित्रपटात काम केले.
मध्यंतरी एक चर्चा जोरदार रंगताना दिसली की, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे घटस्फोट घेणार आहेत आणि त्याचे कारण श्वेता बच्चन आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांचा प्रतिक्षा हा मुंबईतील बंगला श्वेताच्या नावावर केला आणि हेच ऐश्वर्याला पटले नसल्याचे सांगितले जाते. यासोबतच श्वेता बच्चन ही अमिताभ बच्चन यांच्यासोबतच जलसा बंगल्यामध्ये तिच्या मुलांसह राहते.
आता काही दिवसांपूर्वीच श्वेता बच्चन हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये तिने थेट म्हटले की, मी फायनाशियल इंडिपेंडेंट नाहीये. पण मला वाटते की, माझ्या मुलांसोबत असे होऊ नये, मला वाटते की, माझ्या मुलांनी तोपर्यंत लग्न करू नये आणि कुटुंबाचा विचार करू नये, जोपर्यंत ते स्वत:चे रेट स्वत: भरायला शिकतील आणि तेवढे बॅंक बॅंलेस त्यांच्याकडे असावे. श्वेता बच्चन ही अशा कुटुंबातून येते, जिथे अख्ख्ये कुटुंब स्टार आहे आणि पैशांची काहीच कमी नाहीये.
असे असले तरीही श्वेता बच्चनने मुलाखतीच्या माध्यमातून आपल्या मनातील खदखद बोलून दाखवलीये. श्वेता बच्चन ही अमिताभ बच्चनची मुलगी असण्यासोबतच फेमस बिझनेसमॅन निखिल नंदाची पत्नी देखील आहे. काही कंपन्यांची ती मालकीन आहे. श्वेता बच्चन हिची मुलगी नव्या नवेली नंदा ही सोशल मीडियावर चांगली सक्रिय असते. काही दिवसांपूर्वीच तिने आजोबा अमिताभ बच्चन यांच्यासोबत एका जाहिरातीमध्येही काम केले. पण नव्याचा चित्रपटांमध्ये काम करण्याचा कोणत्याही विचार नसल्याचे तिने म्हटले होते.