
बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी एक मोठा काळ बॉलिवूडमध्ये गाजवला. अमिताभ बच्चन यांचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे. काैन बनेंगा करोडपतीच्या माध्यमातून ते आपल्या चाहत्यांच्या भेटीला येतात. आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतात. विशेष म्हणजे अजूनही अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाला चाहते प्रचंड प्रेम करतात. अमिताभ बच्चन सोशल मीडियावर सक्रिय असून विविध पोस्टही शेअर करतात. अर्ध्यापेक्षा जास्त लोक काैन बनेंगा करोडपती हा शो फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन यांच्यासाठी बघतात. बिग बींचा वाढदिवस म्हटले की, त्यांच्या घराबाहेर चाहत्यांची प्रचंड गर्दी असते. विशेष बाब म्हणजे स्वत: अमिताभ बच्चन देखील घराच्या बाहेर येत आपल्या चाहत्यांना भेटतात आणि एकप्रकारे त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करतात. काैन बनेंगा करोडपतीमध्ये अमिताभ बच्चन बऱ्याचदा आपल्या खासगी आयुष्याबद्दलही बोलताना दिसतात.
आता काैन बनेंगा करोडपतीमध्ये अमिताभ बच्चन यांच्या तीन पिढ्या एकत्र दिसणार आहेत. अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याचा चित्रपट इक्कीस हा 1 जानेवारी 2026 रोजी रिलीज होतोय. यावेळी अगस्त्य नंदा हा आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आजोबा अमिताभ बच्चन यांच्या काैन बनेंगा करोडपती शोमध्ये पोहोचला. हेच नाही तर लेकाला सपोर्ट करण्यासाठी आई श्वेता बच्चन आणि बहीण नव्या नवेली नंदाही पोहोचली.
यावेळी काैन बनेंगा करोडपतीच्या सेटवर धमाकेदार वातावरण बघायला मिळाले. यावेळी काही प्रश्नही विचारण्यात आली. यादरम्यान एका मुलीने अगस्त्य नंदा याला विचारले की, आजोबा जास्त आवडतात की, आज्जी? (अमिताभ बच्चन आणि जया बच्चन) हा प्रश्न ऐकताच अगस्त्य नंदा याच्या चेहऱ्याचा रंग उतरला आणि तो थेट म्हणाला की, हे खूप जास्त अवघड आहे. यावेळी श्वेता बच्चनही टेन्शनमध्ये आल्याचे बघायला मिळाले.
यावर अगस्त्य नंदा म्हणाला की, नाही नाही… दुसरा प्रश्न विचारा प्लीज… यावर अमिताभ बच्चन लगेचच म्हणाले की, नाही नाही.. मला पण हे ऐकायचे आहे… यावर जयदीप यांनी म्हटले की, जर व्हॅनिटीमध्ये जाऊन मार खायचा असेल तर आज्जीचे नाव घे… घरी जाऊन मार खायचा असेल तर आजोबांचे नाव घे… यावर सर्वजण हसताना दिसले.