अमिताभ बच्चन यांच्यासोबत इंटिमेट सीन सर्वात मोठी चूक कारण…, काय आहे नेमकं प्रकरण
Amitabh Bachchan : 25 वर्षाच्या अभिनेत्रीसोबत अमिताभ बच्चन यांचे इंटिमेट सीन, पण 'ती' ठरली सर्वात मोठी चूक... सिनेमा कोणता आणि नेमकं प्रकरण काय? सध्या सर्वत्र सिनेमाची चर्चा...

Amitabh Bachchan : महानायक अमिताभ बच्चन यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अमिताभ बच्चन यांनी आता पर्यंत अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण त्यांनी साकरलेल्या काही भूमिका वादाच्या भोवऱ्यात देखील अडकल्या. शिवाय काही सीनमुळे सिनेमा देखील अडचणीत आला. असाच एक सिनेमा ज्यामध्ये अमिताभ बच्चन यांनी 60 वर्षीय वृद्धाची भूमिका बजावलेली आणि ते 18 वर्षाच्या मुलीवर भाळले होते. सिनेमात काही इंटिमेट सीन देखील होते. ज्यामुळे सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकलेला होता..
सध्या ज्या सिनेमाची चर्चा रंगली आहे तो सिनेमा 2007 मध्ये प्रदर्शित झालेला आणि सिनेमाचं नाव ‘निशब्द’ असं होतं. सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिवंगत अभिनेत्री जिया खान हिने भूमिका साकारली होती. आता सिनेमाचे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी सिनेमाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
राम गोपाल वर्मा म्हणाले, ‘सिनेमात अमिताभ बच्चन आणि जिया खान यांच्यामध्ये इंटिमेट सीन शूट करणं माझी सर्वात मोठी चूक होती… कारण त्या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन यांची निवड मी करायला नको होती. कारण प्रेक्षकांमध्ये त्यांची प्रतिभा फार वेगळी आहे. बिग बींच्या प्रतिभेला शोभेल अशी ती भूमिका नव्हती…’
‘निशब्द सिनेमात असा सीन आहे, ज्यामध्ये एका वृद्ध व्यक्तीला एका तरुण मुसीसोबत प्रेम होतं… त्या काळात हे वादग्रस्त होत … विशेषतः अमिताभ बच्चन यांच्या प्रतिभेमुळे… प्रेक्षकांनी त्या भूमिकेत अमिताभ बच्चन यांना स्वीकारलं नाही… पण माझ्या संवेदनशील सिनेमात अभिताभ बच्चन यांनी केलेल्या कामाचं मी कौतुक करेल… ‘
‘निशब्द’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, 2007 मध्ये सिनेमा प्रदर्शित झालेला, पण बॉक्स ऑफिसवर सिनेमा फेल ठरला… सिनेमात अभिनेता अफताब शिवदसानी आणि श्रद्धा आर्या यांसारख्या कलाकारांनी देखील मुख्य भूमिका साकारली होती…
अमिताभ बच्चन यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, वयाच्या 83 व्या वर्षी देखील बिग बी मोठ्या पडद्यावर सक्रिय आहे. आजही चाहते त्यांचे सिनेमे तितक्याच आवडीने पाहत असतात. शिवाय त्यांच्या आगामी सिनेमाच्या प्रतिक्षेत देखील चाहते असतात.
जिया खान हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीच्या कामाची जशी चर्चा झाली तसंच तिच्या मृत्यूबाबतही अनेक तर्क-वितर्क लावले गेले. 3 जून 2013 ला जिया खानच्या जुहूतल्या घरात तिचा मृतदेह आढळून आला. जियाचं वय केवळ 25 वर्षे होतं.
