आधी अश्लील म्हणून मोठा वाद, नंतर ठरलं सुपरहिट; अमिताभ बच्चन यांचं तब्बल 8 मिनिटांचं गाणं प्रत्येकजण ऐकतोच!

सुदेश भोसले आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजातील अमिताभ बच्चन आणि किमी काटकर हिच्यावर चित्रित झालेलं हे गाणं अतिशय लोकप्रिय आहे. मात्र त्याच्या नृत्याच्या स्टेप्सवर सुरुवातीला आक्षेप घेण्यात आला होता. या गाण्याबद्दल सविस्तर जाणू घेऊयात...

आधी अश्लील म्हणून मोठा वाद, नंतर ठरलं सुपरहिट; अमिताभ बच्चन यांचं तब्बल 8 मिनिटांचं गाणं प्रत्येकजण ऐकतोच!
Amitabh Bachchan Superhit Song
Image Credit source: social media
| Updated on: Nov 01, 2026 | 8:59 PM

बॉलिवूडची अनेक गाणी आजही रसिकांच्या मनावर कोरलेली आहेत. ८०-९० मधली गाणी अनेक फॅन्सना आजही आवडतात. अमिताभ बच्चन यांचं एक गाणं आता चर्चेत आलं आहे. त्यामागचं कारण म्हणजे हे गाणं अमिताभ यांच्या केबीसी म्हणजे कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमामध्ये गायलं गेलं. होय, गायक मिका सिंग याने या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्याने बिग बी बच्चन यांचं हे प्रचंड लोकप्रिय गाणं गायलं. या कार्यक्रमाचा रील व्हिडिओ पाहून गाण्याचा मूळ मुख्य गायक सुदेश भोसले याने खास प्रतिक्रिया दिली आहे.

अमिताभ बच्चन यांचं हे गाणं म्हणजे सुदेश भोसले यांनी गायलेलं जुम्मा चुम्मा देदे. या गाण्यच्या निर्मितीवर बोलताना सुदेश यांनी सांगितलं की, या गाण्याचे ध्वनिमुद्रण होताना स्वतः अमिताभ बच्चनही रेकॉर्डिंग स्टुडिओला उपस्थित होते. सुदेश यांनी सांगितलं की, या खास गाण्यासाठी संगीतकार लक्ष्मीकांत- प्यारेलाल यांचे आभार मानतो की त्यांनी या गाण्यासाठी आपल्याला निवडताना आपल्यावर विश्वास ठेवला.

Loading...

दरम्यान, जुम्मा चुम्मा दे दे या गाण्याबद्दल अधिक बोलायचं झालं तर हे गाणं १९९१ मधील लोकप्रिय सिनेमा ‘हम’मधील आहे. या गाण्याचे चित्रिकरण अमिताभ बच्चन आणि किमी काटकर या दोघांवर चित्रित करण्यात आलं होतं. या गाण्याला सुरुवातील अश्लील म्हटलं गेलं.  त्यातील हावभाव आणि नृत्यातील काही स्टेप्सवर आक्षेप घेण्यात आला पण कालांतराने या गाण्याला प्रेक्षकांची तुफान पसंती मिळाली. एवढंच नाही तर हे गाणं चित्रपटातील सर्वात प्रसिद्ध गाण्यांपैकी एक बनलं. लक्ष्मिकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्याला सुदेश भोसले आणि कविता कृष्ममुर्ती यांनी गायलं आहे. हे गाणे आजही अनेक संगीत प्रेमींच्या आवडत्या गाण्यांपैकी एक आहे.

 

गाण्याचे बोल

जुम्मा, जुम्मा, जुम्मा,

जुम्मा, जुम्मा

अरे ओ जुम्मा, मेरी जानेमन, बाहर निकल

आज जुम्मा है, आज का वादा है

देख मैं आ गया, तू भी जल्दी आ

मुझे मत और तड़पा

अरे तू बोली थी पिछले जुम्मे को

चुम्मा दूंगी अगले जुम्मे को

आज जुम्मा है तो आजा आजा

जुम्मा चुम्मा दे दे,

जुम्मा चुम्मा दे दे चुम्मा..

जुम्मे के दिन किया

जुम्मे का वादा

जुम्मे को तोड़ दिया

जुम्मे का वादा

ले आ गया रे फिर जुम्मा

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us