अभिषेकच्या होणाऱ्या बायकोसोबतच अमिताभ यांनी दिलेला Kissing सीन, बॉलिवूडला बसलेला धक्का

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी 20 वर्षांपूर्वी त्यांच्या एका चित्रपटात अभिनेत्रीसोबत किसिंग सीन दिला होता. ती अभिनेत्री त्यांच्यापेक्षा वयाने 36 वर्षांनी लहान होती आणि तिचं लग्न बिग बींचा मुलगा अभिषेक बच्चनशी होणार होतं. परंतु या दोघांच्या लिपलॉक सीनने बॉलिवूड इंडस्ट्रीत खळबळ उडाली होती.

अभिषेकच्या होणाऱ्या बायकोसोबतच अमिताभ यांनी दिलेला Kissing सीन, बॉलिवूडला बसलेला धक्का
ब्लॅक चित्रपटातील हा सीन
Image Credit source: Youtube
| Updated on: Jun 06, 2025 | 3:59 PM

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आजवरच्या 56 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहे. चित्रपटांमधील त्यांच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. परंतु त्यांच्या करिअरमध्ये एक चित्रपट असाही होता, ज्यामध्ये त्यांनी 36 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत किसिंग सीन देऊन खळबळ उडवली होती. त्या किसिंग सीनने बिग बींच्या कुटुंबासोबतच संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्री हादरली होती. हा चित्रपट होता ‘ब्लॅक’.

वीस वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत अभिनेत्री राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत होती. राणीचं एकेकाळी अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चनसोबत अफेअर होतं आणि हे दोघं लग्नसुद्धा करणार होते. परंतु ‘ब्लॅक’ चित्रपटातील बिग बी आणि राणी यांच्या किसिंग सीनने सर्वच जण हडबडले होते. 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ब्लॅक’ या चित्रपटात राणीने मिशेल नावाच्या एका अशा मुलीची भूमिका साकारली होती, जी ऐकू आणि बोलू शकत नाही. तर अमिताभ बच्चन हे तिच्या आयुष्यात शिक्षकाच्या रुपात येतात. एका सीनदरम्यान राणी अमिताभ यांना विचारते की किसिंगचा अनुभव कसा असतो? आणि त्यानंतर या दोघांचा हा लिपलॉक सीन आहे.

‘ब्लॅक’ चित्रपटात काम करताना राणी फक्त 27 वर्षांची होती. तर त्यावेळी बिग बी 63 वर्षांचे होते. या दोन्ही कलाकारांमध्ये 36 वर्षांचं अंतर होतं. त्यावेळी बिग बींना प्रचंड टीकेचा सामना करावा लागला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केलं होतं. त्यामध्ये आयशा कपूर, शेरनाज पटेल, नंदना सेन आणि धृतिमन बॅनर्जी यांच्याही भूमिका होत्या.

अमिताभ आणि जया बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चनचं नाव एकेकाळी अभिनेत्री करिश्मा कपूरसोबतही जोडलं गेलं होतं. हे दोघंसुद्धा लग्नापर्यंत पोहोचले होते. इतकंच नव्हे तर भर पत्रकार परिषदेत जया बच्चन यांनी करिश्माचा उल्लेख बच्चन कुटुंबाची होणारी सून असा केला होता. परंतु काही कारणास्तव या दोघांचं लग्न मोडलं होतं. त्यानंतर अभिषेक आणि राणी मुखर्जीच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. या दोघांनी ‘कभी अलविदा ना कहना’ आणि ‘बंटी और बबली’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं.