
Amitabh Bachchcan Family : बॉलिवूडचं प्रतिष्ठित म्हणून प्रसिद्ध असलेलं बच्चन कुटुंब फक्त त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असतं. कुटुंबातील अनेक वाद देखील चर्चेत असतात अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांची भांडणं तर कधी ऐश्वर्या राय हिचे सासू जया बच्चन आणि नणंद श्वेता यांच्यासोबत असलेले मतभेद… इत्यादी कारणांमुळे बच्चन कुटुंब चर्चेत असतं. पण नुकताच झालेल्या एक मुलाखतीत बिग बींची नात नव्या नवेली नंदा हिने बच्चन कुटुंबात चार भिंतींमध्ये काय होतं… हे सांगितलं आहे.
मुलाखतीत नव्या म्हणाली, ‘मी माझ्या बालपणी आजी – आजोबांकडे (अमिताभ बच्चन – जया बच्चन) जास्त राहिली आहे आणि आम्ही कायम एकत्र राहायचो… आजच्या तरुणांसाठी हे थोडंफार असामान्य असेल… आमच्यामध्ये कधीच भांडणं होतं नाहीत. आम्ही अनेक मुद्द्यांवर चर्चा करतो… आम्ही आजच्या काळातील आणि महत्त्वाच्या विषयांवर बोलता…’
नव्याने स्पष्ट केले की तिच्या पॉडकास्टच्या प्रत्येक भागात चर्चा किंवा मतभेद असतात, पण कधीच वाद होत नसतात. ‘आमचे विचार वेगळे असू शकतात पण मुल्य एकसारखेच आहेत… माझ्या कुटुंबानी मला, माझा भाऊ अगस्त्य नंदा आणि बहीण आराध्या बच्चन यांना सम्मान आणि कुटुंमाचं महत्त्व सांगितलं आहे. आजी – आजोबा असो किंवा कुटुंबातील कोणी लहान व्यक्ती आम्ही एकमेकांच्या कामाचा आणि आम्ही आमच्या मुळांचा आदर करतो…’
नव्याने असंही सांगितलं की तिला तिची आई श्वेता गृहिणी असण्याचं महत्त्व समजलं. नव्या म्हणाली, ‘तुम्हा CEO असाल किंवा गृहिणी… आपला मार्ग निवडल्याचा सम्मान असला पाहिजे… गृहिणी फक्त गृहिणी नसते… ती पुढच्या पिढीला तयार करत असते… हे एक मोठं काम आहे.’ नव्या असं देखील म्हणाली की, तिच्या आई – वडिलांनी तिला कोणत्याही स्वार्थाशिवाय वाढवले.
नव्या नवेली हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री नसली तरी नव्या हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. नव्या आजी – आजोबांप्रमाणे बॉलिवूडमध्ये नाही तर, उद्योग क्षेत्रात सक्रिय आहे. नव्या तिच्या वडिलांसोबत देखील व्यवसाय करते. सोशल मीडियावर नव्या कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी नव्या कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.