अमोल कोल्हे करणार अमृता खानविलकरशी लग्न? शेअर केलेल्या पोस्टमुळे चर्चांना उधाण

यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अभिनेत्री अमृता खानविलकरनेही पोस्टवर आश्चर्य व्यक्त करत लिहिलंय, 'हे काय आहे?' यासोबतच तिने आश्चर्यचकीत झाल्याचे इमोजी पोस्ट केले आहेत.

अमोल कोल्हे करणार अमृता खानविलकरशी लग्न? शेअर केलेल्या पोस्टमुळे चर्चांना उधाण
Amol Kolhe and Amruta Khanvilkar
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 02, 2023 | 11:36 AM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहेत. यामागचं कारण म्हणजे त्यांच्या नावाने व्हायरल झालेली एक पोस्ट. ही पोस्ट त्यांनी खुद्द इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. अमोल कोल्हे हे अभिनेत्री अमृता खानविलकरशी लग्न करणार असल्याची बातमी छापलेली ही पोस्ट आहे. ही पोस्ट शेअर करत त्यावर कोल्हेंनी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. या पोस्टवर अभिनेत्री अमृताचीही कमेंट पहायला मिळतेय.

नेमकी काय आहे पोस्ट?

खासदार डॉ, अमोल कोल्हे अमृता खानविलकर बरोबर लग्न करणार, असं या बातमीचं शीर्षक आहे. त्याखाली लिहिलंय, ‘राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे सध्याच्या बायकोला कंटाळले आहेत. ‘वाजले की बारा’ फेम अमृता खानविलकर हिच्या प्रेमात ते पागल झाले आहेत. लवकरच ते पहिल्या बायकोला घटस्फोट देऊन आणि अमृता खानविलकर तिच्या पहिल्या पतीला घटस्फोट देऊन दोघं विवाहबद्ध होणार असल्याचं चित्रपटक्षेत्रात बोललं जात आहे. या विवाहाचा माझ्या राजकीय कारकिर्दीवर काहीही परिणाम होणार नाही. उलट अमृताशी लग्न केल्यामुळे मी पण उपमुख्यमंत्री होऊ शकेन, कारण अमृता हे नावच लकी आहे राजकारण्यांना, असं ते म्हणाले.’

अमोल कोल्हे यांची पोस्ट-

‘हा कोणता पेपर आहे ठाऊक नाही पण शेवटच्या ओळीतील क्रिएटिव्हिटी.. काय बोलावं? नशीब बायकोला आज 1 एप्रिल आहे हे माहित होतं. नाहीतर संपादर महोदयांकडे जेवणाची सोय करावी लागली असती’, असं त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय. यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अभिनेत्री अमृता खानविलकरनेही पोस्टवर आश्चर्य व्यक्त करत लिहिलंय, ‘हे काय आहे?’ यासोबतच तिने आश्चर्यचकीत झाल्याचे इमोजी पोस्ट केले आहेत.

हद्द पार करतात लोक, असं एका नेटकऱ्याने म्हटलंय. तर काहींनी लग्नाच्या शुभेच्छा मग.. असं म्हणत विनोदाचा आनंद घेतला आहे. ‘अवघड आहे सगळं, पण ती शेवटची ओळ बापरे’ असंही एका युजरने लिहिलंय. सोशल मीडियावरील या पोस्टमुळे नेटकऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. एप्रिल फुलचं निमित्त साधत काही नेटकऱ्यांनी त्यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.