खलनायक अमरीश पुरींची लेक फारच ग्लॅमरस; मराठी मुलासोबत लग्न अन् लाईमलाईटपासून दूर राहून या क्षेत्रात कमावतेय नाव

मनोरंजन जगतातील खलनायक आणि परिपूर्ण अभिनेता, अमरीश पुरी हे अशा दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहेत ज्यांनी आपल्या अभिनयाने सर्वांचे मन जिंकले. अमरीश पुरी यांची लेक नम्रता पुरीबद्दल फार कोणाला माहित नाही. नम्रता ही फारच ग्लॅमरस असून ती बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देते. ती नक्की काय करते हे जाणून घेऊयात.

खलनायक अमरीश पुरींची लेक फारच ग्लॅमरस; मराठी मुलासोबत लग्न अन् लाईमलाईटपासून दूर राहून या क्षेत्रात कमावतेय नाव
Amrish Puri daughter is
Image Credit source: instagram
| Updated on: May 31, 2025 | 11:02 AM

जेव्हा जेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम आणि सर्वात शक्तिशाली खलनायकांचा विचार केला जातो तेव्हा ज्येष्ठ आणि दिवंगत अभिनेते अमरीश पुरी यांचे नाव प्रथम येतं. अमरीश पुरी यांनी त्यांच्या अद्भुत अभिनय कौशल्याने आणि दमदार आवाजाने अनेक वेळा मोठ्या पडद्यावरील नायकांनाही थक्क केले होते. त्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने साडेतीन दशके बॉलिवूडवर राज्य केले. त्यांचा भारदस्त आवाज आणि त्यांचे डायलॉगचे आजही सर्वजण चाहते आहेत. पण अमरीश पुरींच्या बॉलिवूड करिअरबद्दल माहित असलं तरी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहित आहे.

अमरीश पुरी यांची लेक लाईमलाईटपासून दूर

22 जून 1932 रोजी पंजाबमधील नवांशहर येथे जन्मलेल्या अमरीश पुरी यांनी 1957 मध्ये उर्मिला दिवेकर यांच्याशी लग्न केलं. लग्नानंतर उर्मिला आणि अमरीश साहेब यांना दोन मुले झाली. या जोडप्याला राजीव पुरी नावाचा मुलगा आणि नम्रता पुरी नावाची मुलगी आहे. पण अमरीश पुरी यांची लेक या लाईमलाईटपासून दूरच असते.तिला या फिल्मइंडस्ट्रीमध्ये फार काही रस नाही. मग ती काय करतेय जाणून घेऊयात.

मराठी मुलाशी लग्न 

अमरीश पुरी यांची मुलगी नम्रता पुरी हिचा जन्म 20 ऑगस्ट 1983 रोजी मुंबईत झाला. नम्रता विवाहित आहे. तिचे लग्न शिरीष बागवे या महाराष्ट्रीयन मुलाशी तिने लग्न केलं आहे. ती तिच्या पतीसोबत आनंदी जीवन जगत आहे.नम्रता पुरी तिच्या वडिलांप्रमाणे बॉलिवूडमध्ये काम करू शकली नाही. मात्र सौंदर्याच्या बाबतीत ती बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकते.

नम्रताचे सौंदर्य आणि फिटनेस थक्क करणारं

नम्रता 41 वर्षांची आहे, पण या वयातही तिचे सौंदर्य आणि फिटनेस थक्क करणारं आहे.अमरीश पुरी त्यांच्या काळात खूप चर्चेत होते. तथापि, त्याची लाडकी मुलगी प्रसिद्धीपासून दूरच आहे. पण ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नम्रताला इंस्टाग्रामवर 12 हजारांहून अधिक लोक फॉलो करतात, तर ती स्वतः 846 लोकांना फॉलो करते. आतापर्यंत तिने तिच्या इन्स्टा हँडलवरून 600 हून अधिक पोस्ट केल्या आहेत.

नम्रता नक्की करते काय?

नम्रता पुरीला तिच्या वडिलांप्रमाणे बॉलिवूडमध्ये फारसा रस नाही. ती व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर असली तरी ती असली तरी एक फॅशन डिझायनर आहे. फॅशन डिझायनर म्हणून फॅशन जगात स्वतःचे नाव कमावत आहे. तिला पापाराझी आणि लाइमलाइटपासून दूर राहणे आवडते. नम्रताचा स्वतःचा कपड्यांचा ब्रँड आहे, ती अनेक महागडे कपडे डिझाइन करते. तिने डिझाइन केलेले कपडे मोठ्या मॉडेल्स घालतात. नम्रता सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे, ती एकामागून एक फोटो शेअर करते. तसेच तिचे फोटो पाहून अनेकदा नेटकरी तिला चित्रपटांमध्ये येण्यासाठी विचार करण्याचा सल्लाही देतात.