बकवास, सगळे घाणेरडे..; कोणावर इतक्या चिडल्या जया बच्चन? व्हिडीओ व्हायरल

ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिवंगत दिग्दर्शक रोनो मुखर्जी यांच्या प्रार्थनासभेला त्या पोहोचल्या होत्या. तिथून बाहेर पडताना त्यांचा राग अनावर झाला. त्या नेमकं कशामुळे इतक्या चिडल्या होत्या, ते जाणून घ्या..

बकवास, सगळे घाणेरडे..; कोणावर इतक्या चिडल्या जया बच्चन? व्हिडीओ व्हायरल
जया बच्चन, श्वेता बच्चन
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 04, 2025 | 4:04 PM

दिग्दर्शक रोनो मुखर्जी यांच्या निधनानंतर मंगळवारी मुंबईत प्रार्थनासभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन, त्यांची मुलगी श्वेता बच्चन आणि अभिनेत्री काजोल तिथे उपस्थित होत्या. ज्याठिकाणी या शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं, तिथे काही पापाराझीसुद्धा सेलिब्रिटींचे फोटो आणि व्हिडीओ शूट करण्यासाठी पोहोचले होते. त्यांना पाहून जया बच्चन खूप चिडल्या होत्या. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संतापलेल्या जया यांनी पापाराझींना थेट म्हटलं की, “या आता माझ्या गाडीतच बसा.” जया बच्चन या त्यांच्या तापट स्वभावासाठी ओळखल्या जातात. पापाराझींवर अशा पद्धतीने चिडण्याची त्यांची ही पहिलीच वेळ नाही.

रोनो मुखर्जी यांचा मुलगा सम्राट मुखर्जीसोबत पायऱ्या उतरत असताना जया यांच्याभोवती पापाराझी घोळका करतात. ते पाहून जया खूपच चिडतात आणि सम्राट यांना बंगालीत म्हणतात, “इदेर कानो डाको” (तू त्यांना का बोलावलंस?) त्यावर ते म्हणाले, “आमि डाकिनी” (मी त्यांना बोलावलं नाही). आणखी एका व्हिडीओमध्ये जया आणि श्वेता त्यांच्या कारसाठी थांबलेल्या असतात. जेव्हा त्या कारमध्ये बसायला जातात तेव्हा त्या पापाराझींना म्हणतात, “चला तुम्हीपण सोबत चला..या.” इतकंच नव्हे तर “बकवास सगळं, घाणेरडे सर्वजण घाणेरडे” अशा शब्दांत त्या राग व्यक्त करतात.

जया बच्चन यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘या नेहमी कोणा ना कोणावर भडकत असतात. अमिताभजी यांना कसं सहन करतात’, असा सवाल एकाने केला. तर ‘ऐश्वर्या रायवर रोज राग व्यक्त करत असेल’, असंही दुसऱ्याने म्हटलंय.

रोनो मुखर्जी हे ‘हैवान’ (1977) आणि ‘तू ही मेरी जिंदगी’ (1965) यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखले जायचे. गेल्या आठवड्यात मुंबईत त्यांचं कार्डिॲक अरेस्टने निधन झालं. रोनो हे अभिनेत्री काजोल आणि राणी मुखर्जी यांचे काका होते. त्यांना शर्बानी, सिद्धार्थ आणि सम्राट अशी तीन मुलं आहेत. रोनो हे मुखर्जी बंधूंपैकी सर्वांत मोठे होते आणि उत्तर बॉम्बे दुर्गा पूजा समुदायाचे ते अध्यक्ष होते.