तो बिचारा फोटोसाठी आला अन् नाना पाटेकरांनी बघा कसं मारलं; व्हिडीओ व्हायरल

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर सध्या त्यांच्या आगामी 'जर्नी' या चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त वाराणसीमध्ये आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एक चाहता त्यांच्यासोबत सेल्फी क्लिक करण्यासाठी आला. त्यावेळी नानांचा पारा चढला आणि त्यांनी थेट त्याच्या कानशिलात लगावली.

तो बिचारा फोटोसाठी आला अन् नाना पाटेकरांनी बघा कसं मारलं; व्हिडीओ व्हायरल
Nana Patekar
Image Credit source: Twitter
| Updated on: Nov 15, 2023 | 1:40 PM

वाराणसी : 15 नोव्हेंबर 2023 | सेलिब्रिटीज कधी चाहत्यांवर प्रेमाचा वर्षाव करतील आणि कधी त्यांच्यावर चिडतील याचा काही नेम नाही. असंच एक उदाहरण नुकतंच अभिनेते नाना पाटेकर यांच्या एका शूटिंगदरम्यान पहायला मिळालं. नाना यांना इतका राग आला की त्यांनी सर्वांसमोर एका चाहत्याच्या कानशिलात लगावली. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नाना यांचं हे वागणं पाहून नेटकरी त्यांच्यावर नाराज झाले आहेत. नानांचं हे वागणं बरोबर नाही, असं अनेकांनी म्हटलंय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एका शूटिंगदरम्यानचा आहे. यामध्ये नाना एका सीनच्या शूटिंगसाठी वेशभूषेत उभे असल्याचं पहायला मिळतंय. त्याचवेळी मागून एक चाहता नानांच्या जवळ येतो आणि त्यांच्यासोबत सेल्फी क्लिक करण्याचा प्रयत्न करतो. हे पाहून नाना चांगलेच चिडतात आणि त्याच्या कानखाली वाजवतात. त्यानंतर नानांच्या बाजूला असलेली व्यक्ती त्या चाहत्याला तिथून बाजूला काढते. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

एखाद्या ठिकाणी जेव्हा चित्रपटाची शूटिंग होत असते, तेव्हा तिथल्या स्थानिक लोकांना त्याचं फार कुतुहल असतं. सेलिब्रिटींना पाहण्यासाठी आणि त्यांच्यासोबत फोटो क्लिक करण्यासाठी ते तिथे जमा होतात. नाना पाटेकर सध्या वाराणसीमध्ये त्यांच्या आगामी ‘जर्नी’ या चित्रपटाचं शूटिंग करत आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये हे स्पष्ट पहायला मिळतंय की, नाना त्यांच्या सीनसाठी उभे असतात आणि तेव्हाच चाहता समोर आल्याने त्यांचा राग अनावर होतो. क्षणभराचाही विचार न करता ते त्याला सर्वांसमोर मारतात.

पहा व्हिडीओ

‘जर्नी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन ‘गदर 2’ फेम अनिल शर्मा करत आहेत. यामध्ये त्यांचा मुलगा उत्कर्ष शर्मा मुख्य भूमिकेत आहे. बापलेकाच्या नात्यावर या चित्रपटाची कथा आधारित आहे. चित्रपटाच्या सेटवरील नानांचं हे वागणं पाहून चाहते नाराज झाले आहेत. ‘सर्वसामान्य लोकांचा आदर करा’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.