दिशा आणि टायगर खरंच रिलेशनशिपमध्ये? अनिल कपूरचं सूचक विधान

अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी रिलेशनशिपमध्ये असल्याच्या अनेकवेळा चर्चा होतात (Anil kapoor statement about Disha Patani and Tiger Shroff relationship).

दिशा आणि टायगर खरंच रिलेशनशिपमध्ये? अनिल कपूरचं सूचक विधान
Follow us
| Updated on: Jan 05, 2021 | 7:02 PM

मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी रिलेशनशिपमध्ये असल्याच्या अनेकवेळा चर्चा होतात. विशेष म्हणजे टायगर आणि दिशा अनेकवेळा एकत्र फिरताना दिसले आहेत. सोशल मीडियावरही ते एकमेकांच्या फोटोवर कमेंट करत असतात. मात्र, त्यांनी अजूनही आपल्या नात्याविषयी खुलेआमपणे भूमिका मांडलेली नाही. दरम्यान, अभिनेता अनिल कपूरने एका टीव्ही कार्यक्रमात टायगर आणि दिशाच्या नात्यावर भाष्य केलं आहे (Anil kapoor statement about Disha Patani and Tiger Shroff relationship).

अनिल कपूर कपिल शर्मा शो या कार्यक्रमात नुकताच आला होता. या कार्यक्रमात त्याने टायगर आणि दिशाच्या रिलेशनबाबत वक्तव्य केलं आहे. अनिल कपूरला कार्यक्रमात कोणत्या अभिनेत्याचा डायट प्लॅन चोरावासा वाटतो? असा प्रश्व विचारला गेला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना अनिलने टायगर श्रॉफचं नाव घेतलं. “मी अजूनपर्यंत टायगर श्रॉफसोबत काम केलेलं नाही. मात्र, मी टायगरची गर्लफ्रेंड दिशा पाटनीचा डायट प्लॅन चोरी नक्की केलाय”, असं अनिल कपूर म्हणाला.

काही दिवसांपूर्वी टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी मालदीवला गेले होते. दोघांनी मालदिवचे फोटो शेअर केले होते. मात्र, तेव्हादेखील दोघांनी एकमेकांसोबतचे फोटो शेअर केले नव्हते (Anil kapoor statement about Disha Patani and Tiger Shroff relationship).

टायगर श्रॉफच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं झाल्यास तर तो ‘बागी 3’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसेल. याशिवाय टायगर ‘हिरोपंती 2’ आणि ‘गणपत’ या चित्रपटांमध्येही दिसेल. दुसरीकडे दिशा पटानी अभिनेता सलमान खानच्या ‘राधे’ आणि ‘मलंग 2’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा : समुद्रकिनारी बिकिनीवर दिशा पाटनी, सोशल मिडीयावर कौतुक आणि ट्रोलही…!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.